आज दुसरा टी२० सामना, कोहली प्रयोग करण्याची शक्यता

अखेरच्या सामन्यात ‘बेंच स्ट्रेंथ’ला संधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 05:12 AM2018-06-29T05:12:48+5:302018-06-29T05:13:05+5:30

whatsapp join usJoin us
Today, the second T20 match, the possibility of using Kohli | आज दुसरा टी२० सामना, कोहली प्रयोग करण्याची शक्यता

आज दुसरा टी२० सामना, कोहली प्रयोग करण्याची शक्यता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मालाहाइड (डब्लिन) : इंग्लंडविरुद्ध आव्हानात्मक दौऱ्यासाठी सर्वांनाच खेळपट्टीचा अंदाज यावा यादृष्टीने भारतीय संघ शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध दुसºया आणि अखेरच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ‘बेंच स्ट्रेंथ’ला संधी देण्याची शक्यता आहे.
भारताने ब्रिटनच्या तीन महिन्यांच्या प्रदीर्घ दौºयाची शानदार सुरुवात करताना आयर्लंडवर पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ७६ धावांनी विजय नोंदवला.
रोहित शर्मा व शिखर धवन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५ बाद २०८ अशी धावसंख्या उभारल्यानंतर कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांनी एकूण ७ गडी बाद करीत आयर्लंडला १३२ धावाच करू दिल्या. या कामगिरीमुळे भारतीय संघ इंग्लंड दौºयासाठी चांगल्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले; परंतु सर्वात मोठा प्रश्न हा ‘बेंच स्ट्रेंथ’चा असून लोकेश राहुल, दिनेश कार्तिक व उमेश यादव यांना संधी देण्याविषयीचा आहे.
कर्णधार विराट कोहलीने पहिल्या टी२० सामन्यानंतर म्हटले की, ‘‘आम्ही मधल्या फळीत प्रयोग करणार आहोत व प्रत्येकाला खेळवू इच्छितो. कारण अनेक खेळाडू दौºयावर जातात; परंतु त्यांना संधी मिळत नाही.’’
भारताने मर्यादित षटकांसाठी रोहित आणि धवन या सलामीवीरांनाच पहिल्या पसंतीचा पर्याय म्हणून निवडले. त्यामुळे संधी मिळाल्यास राहुल मधल्या फळीत फलंदाजी करेल आणि हे जवळपास दुसºया सामन्यात होऊ शकते. सामन्यानंतर कोहलीने संघ पाहता बदल होणे निश्चित असल्याचे सांगितले; परंतु भारत गोलंदाजी आक्रमणात मोठे बदल करणार अथवा नाही याचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. तथापि, रोहित, धवन, स्वत: कोहली, धोनी आणि दोन फिरकी गोलंदाज यांना संघाबाहेर ठेवले जाऊ शकत नाही. कुलदीप आणि चहल खेळपट्टीचा लाभ घेण्यात यशस्वी ठरले आहेत आणि आयर्लंडचा कर्णधार गॅरी विल्सन याने पहिले गोलंदाजी करणे अथवा नंतर याविषयी फारसा फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)

सामना : भारतीय वेळेनुसार साडेआठ वाजता सुरू होईल
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा , शिखर धवन, लोकेश राहुल , मनीष पांडे , सुरेश रैना, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, सिद्धार्थ कौल.

आयर्लंड : गॅरी विल्सन (कर्णधार, यष्टिरक्षक), अँड्र्यू बलबिर्नी, पीटर चेज, जॉर्ज डकरेल, जोश लिटिल, अँडी मॅब्राइन, केविन ओब्रायन, विलियम पोर्टरफील्ड , स्टुअर्ट पोंइटर, बोएड रँकिन, जेम्स शॅनोन , सिमीसिंह , पॉल स्टर्लिंग, स्टुअर्ट थॉमसन.

Web Title: Today, the second T20 match, the possibility of using Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.