Join us  

प्रणयाच्या खेळपट्टीवरही या क्रिकेटपटूंची जोरदार बॅटींग

क्रिकेटमधल्या 22 यार्डाच्या खेळपट्टीवर बऱ्याच खेळाडूंची जोरदार बॅटींग साऱ्यांना परवलीचीच. पण क्रिकेटबरोबर काही खेळाडूंनी प्रणयाच्या खेळपट्टीवरही जोरदार बॅटींग केल्या बऱ्याच गोष्टी यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामधल्या काही प्रकाशझोतात आल्या तर काही मंद प्रकाशात विरुनही गेल्या.

By प्रसाद लाड | Published: March 07, 2018 7:28 PM

Open in App
ठळक मुद्दे बुधवारी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या  अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याची बातमी प्रकाशझोतात आली आणि क्रिकेटपटूंची मैदानाबाहेरील कामगिरी डोळ्यापुढे तरळून गेली.

मुंबई : क्रिकेटमधल्या 22 यार्डाच्या खेळपट्टीवर बऱ्याच खेळाडूंची जोरदार बॅटींग साऱ्यांना परवलीचीच. पण क्रिकेटबरोबर काही खेळाडूंनी प्रणयाच्या खेळपट्टीवरही जोरदार बॅटींग केल्या बऱ्याच गोष्टी यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामधल्या काही प्रकाशझोतात आल्या तर काही मंद प्रकाशात विरुनही गेल्या. बुधवारी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या  अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याची बातमी प्रकाशझोतात आली आणि क्रिकेटपटूंची मैदानाबाहेरील कामगिरी डोळ्यापुढे तरळून गेली.

शामी 2-3 दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह सहकारी मित्र वृद्धिमान साहाच्या घरी स्नेह भोजनासाठी गेला होता. त्यावेळी साहाने दोन्ही कुटुंबियांचे फोटोज समाजमाध्यमांवर पोस्ट केले. त्यानंतर काही दिवसांमध्ये लाजाळू शामीच्या बाबतीत अशी बातमी यावी, हे धक्कादायकच. पण यापूर्वी यासारखे बरेच धक्के चाहत्यांनी पचवलेले आहेत.

काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधारा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यातील अफेअरची बातमी कानावर पडली. त्यानंतर अनुष्का भारताचे काही सामने पाहण्यासाठी गेली होती. जेव्हा जेव्हा अनुष्का सामने पाहायला गेली तेव्हा तेव्हा कोहलीची कामगिरी चांगली होत नव्हती. कोहलीसाठी अनुष्का लकी नसल्याची चर्चा त्यावेळी चांगलीच रंगली होती. कोहली आणि अनुष्का यांच्यातील संबंध संपल्याचीही चर्चा सुरु झाली होती. पण अखेर कोहलीने अनुष्काचीच लग्न ठरवत त्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

दीपिका पदुकोणने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा तिचं नाव सुरुवातीला युवराज सिंगशी जोडलं गेलं. त्यानंतर काही दिवसांनी दीपिका आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अफेअर सुरु असल्याची चर्चा सुरु झाली. त्यावेळी दिपिकामुळे युवराज आणि धोनी यांच्यातील मैत्री तुटल्याच्या चर्चेला उत आला होता. युवराजचे दीपिकापूर्वी बॉलीवूडमधल्या किम शर्माबरोबरही संबंध असल्याचे काही जणांनी प्रसारमाध्यमांवर म्हटले होते. आयपीएलला सुरुवात झाल्यावर युवराज आणि प्रीती झिंटा यांच्यामध्ये चांगलीच प्रीत बहरली होती. या दोघांचे पार्टीचे फोटोज पाहून काही जणांनी भुवयाही उंचावल्या होत्या.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान हा तसा मितभाषी आणि लाजाळू व्यक्तीमत्व. पण त्याचे डान्सर इशा शर्वाणीबरोबर अफेअरची चर्चा सुरु झाली होती. पण काही जणांना या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि गीता बसरा यांच्यातील संबंधही समाजमाध्यमांवर साऱ्यांच्या नजरेस पडले होते. 

विश्वसुंदरी सुश्मिता सेनेच्या प्रेमात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रम प्रेमात पडला होता. या दोघांच्या प्रेम कहाण्या चाहत्यांमध्ये चांगल्याच रंगल्या होत्या. सानिया मिर्झाबरोबर लग्न होण्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब अख्तरचे सायली भगतबरोबरच्या अफेअरची चर्चा चांगली रंगली होती.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली जसा मैदानात आक्रमक वाटायचा तसा तो मैदानाबाहेरही प्रेमात दारा असल्याचे पाहायला मिळाले होते. डोनाबरोबर लग्न झाल्यावरही गांगुलीचे अभिनेत्री नगमाबरोबरचे संबंध सर्वश्रृत होते. अजय जडेचाचे नाव तर माधुरी दिक्षीत, तब्बू, रवीना टंडनशी जोडले गेले होते. मोहम्मद अझरुद्दिनने अभिनेत्री संगीता बिजलानीबरोबर दुसरे लग्नही केले होते.

सर गॅरी सोबर्स हे 1966-67 साली भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बॉलीवडूच्या अंजू महेंद्रू यांच्याबरोबर नाव जोडले गेले होते. काही वर्ष त्यांच्यामध्ये संबंध होते, पण त्यानंतर सोबर्स यांनी आपल्या ऑस्ट्रेलियामधील प्रेयसीबरोबर लग्न केले. 

भारताचे माजी कसोटीपटू वेंकट राघवन यांचे हेमा मालिनी यांच्यातील संबंधांची चर्चाही चांगलीच रंगली होती. भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सैफ अली खानची पहिली बायको अमृता सिंगबरोबर नाव जोडलं गेलं होते.

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांचे ' कभी अजनबी' या सिनेमातील देबश्री रॉयबरोबर अफेअर असल्याची गोष्टही पुढे आली होती.

क्रिकेटपटू आणि बॉलीवूडमधील अभिनेत्री यांच्यामध्ये आतापर्यंत बरीच प्रेम प्रकरणे झाली, ती यापुढेही होतील, पण चाहत्यांना मात्र या आठवणींमध्ये रमायला नेहमीच आकंठ बुडायला आवडतं, हे तेवढंच खरं.

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्री