Join us  

क्रिकेटमध्ये आकडेवारीच सर्वकाही नाही, क्रिकेट जाणकारांमध्ये चर्वितचर्वण सुरू

विराट कोहली जेव्हापासून मैदानात दाखल झाला तेव्हापासून क्रिकेट जाणकारांमध्ये चर्वितचर्वण सुरू झाले. वन-डे क्रिकेटमध्ये त्याचा धावा फटकावण्याचा वेग आश्चर्यचकित करणारा आहे. २०१७ मध्ये त्याने एकट्याने आतापर्यंत १४६० धावा फटकावल्या आहेत. या क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात कुठल्याही कर्णधारातर्फे फटकावलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 3:30 AM

Open in App

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)

विराट कोहली जेव्हापासून मैदानात दाखल झाला तेव्हापासून क्रिकेट जाणकारांमध्ये चर्वितचर्वण सुरू झाले. वन-डे क्रिकेटमध्ये त्याचा धावा फटकावण्याचा वेग आश्चर्यचकित करणारा आहे. २०१७ मध्ये त्याने एकट्याने आतापर्यंत १४६० धावा फटकावल्या आहेत. या क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात कुठल्याही कर्णधारातर्फे फटकावलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.विराटने शानदार फॉर्मच्या जोरावर आतापर्यंत केवळ २०२ सामन्यांत ९०३० धावा फटकावल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत फटकावलेल्या दोन शतकांमुळे त्याने झळकावलेल्या शतकांची संख्या ३२ पर्यंत पोहोचलेली आहे.केवळ हाशिम अमला (१५५ सामन्यांत २६ शतके) हाच फलंदाज तुलनेने त्याच्या धावा फटकावण्याच्या गतीच्या जवळ आहे आणि केवळ विक्रमवीर सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे आहे. सचिनने ४६३ सामन्यात ४९ शतके ठोकली आहेत. विश्लेषकांसाठी आणखी बरेच काही आहे. त्याची सध्याची फलंदाजी सरासरी ५५.७४ आहे. वन-डे क्रिकेटमध्ये आजी-माजी खेळाडूंमध्ये ही सर्वाधिक आहे. त्याचा स्ट्राईक रेट ९१.७३ असून वर्तमान खेळाडूंमध्ये एबी डिव्हिलियर्सनंतर सर्वाधिक आहे. ही आश्चर्यचकित करणारी आकडेवारी स्वाभाविकपणे कोहली वन-डे सामन्यातील महान फलंदाज नाही का, अशी चर्चा करण्यास पुरेशी आहे.इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने गेल्या आठवड्यात सकारात्मक टिष्ट्वट केले होते. अन्य खेळाडूंमध्ये झटपट प्रतिक्रिया व्यक्त करणारा आॅस्ट्रेलियाचा दिग्गज डीन जोन्ससारख्या खेळाडूने कोहलीबाबत भाष्य करण्यापासून स्वत:ला थांबविलेले आहे. माझ्या मते आकडेवारीला क्रिकेटमध्ये विशेष महत्त्व आहे. कुणा खेळाडूच्या क्षमतेचे आकलन करण्यासाठी आकडेवारी महत्त्वाची ठरू शकते, पण त्यामुळे खेळाडूची महानता सिद्ध होईलच, हे आवश्यक नाही.उदाहरण द्यायचे झाल्यास आॅस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम व्होग्सचे देता येईल. व्होग्सची कसोटी क्रिकेटमध्ये सरासरी ६१.८७ आहे. कसोटी क्रिकेट इतिहासात सर डोनाल्ड ब्रॅडमननंतर ही सर्वोत्तम आहे. पण त्यामुळे व्होग्स या कारणामुळे दुसरा सर्वोत्तम फलंदाज आहे, असे कुणी म्हणणार नाही. माझ्या मते केवळ ब्रॅडमन यांचा अपवाद आहे. त्यांचा ९९.९४ ची सरासरी जाणकारांसाठी त्यांच्या महानतेबाबत सांगण्यास पुरेशी आहे.या व्यतिरिक्त सामन्याची स्थिती, खेळपट्टीचा दर्जा, गोलंदाज कोण आहे आदी बाबींचाही फरक पडतो. खराब खेळपट्टीवर अर्धशतक झळकावणे फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर फटकावलेल्या शतकापेक्षाही महत्त्वाचे आहे, पण ही बाब आकडेवारीमध्ये स्पष्ट होत नाही. ही बाब जेवढी वन-डे क्रिकेटला लागू होते तेवढीच कसोटी क्रिकेटलाही लागू होते.उदाहरण द्यायचे झाल्यास सर व्हिवियन रिचर्ड््स आतापर्यंत सर्वोत्तम वन-डे खेळाडू मानल्या जातात, पण त्यांनी केवळ ११ शतके झळकावली. रिचर्ड््स यांच्या पंक्तीत असलेल्या तेंडुलकरची सरासरी ४४.८३ आहे. ही कोहलीच्या तुलनेत बरीच कमी आहे. पण, रिचर्ड््स विश्वकप जिंकणा-या दोन संघाचा सदस्य होता. त्यांच्या काळात झिम्बाब्वे, बांगलादेश, आयर्लंड, अफगाणिस्तान यांच्यासारखे संघ नव्हते. तेंडुलकर चार विश्वकप स्पर्धेत (१९९६, १९९९, २००३ आणि २०११) सर्वात आघाडीवर होता आणि एकदा विजेता संघाचा सदस्य होता. कोहलीची आतापर्यंतची कामगिरी चमकदार आहे आणि तो विश्वकप जिंकणाºया संघाचा (२०११) सदस्यही होता. कोहलीने अन्य उत्कृष्ट फलंदाजांना स्पष्टपणे पिछाडीवर सोडले का ? संबंधित देश आणि कालावधीच्या आधारावर महानतेबाबत वादविवाद अधिक रंगू शकतो. पॉन्टिंग, हेडन, गिलख्रिस्ट, लॉयड, ग्रिनिज, गेल, मियांदाद, इंजमाम, कॅलिस, सेहवाग, गांगुली, संगकारा, जयसूर्या, डिविलियर्स, अमला आणि सध्या शानदार फॉर्मात असलेल्या कोहलीसह रोहित यांच्यासारखे काही नावांना चर्चेमध्ये स्थान मिळू शकते.कोहलीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे तो सुरुवातीपासून या क्लासमध्ये आहे. दरम्यान, त्याने कारकिर्दीचा केवळ अर्धाच पल्ला गाठला आहे. दुस-या टप्प्यातही त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली तर ही चर्चा अनावश्यक ठरेल.

टॅग्स :विराट कोहली