Join us  

विराटचा प्रशासकीय निर्णयांमध्ये प्रभाव नाही

कर्णधाराच्या अधिकाराव्यतिरिक्त विराटने कुठल्याही प्रकारचा प्रभाव टाकला, अशी तक्रार घेऊन माझ्याकडे कुणी आलेले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:28 AM

Open in App

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचे वलय निर्माण झाले आहे, पण नीतिगत निर्णयामध्ये तो आपल्या प्रभावाचा वापर करतो, असे वाटत नसल्याचे प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांचे मत आहे. राय यांचा कोहलीसोबत नीतिगत निर्णयाबाबतचा पहिला अनुभव १६ महिन्यांपूर्वीचा आहे. भारतीय कर्णधाराबाबत त्यांचे वैयक्तिक मत आहे.राय म्हणाले, ‘कुठलाही कर्णधार संघावर निश्चितच काही अंशी प्रभाव टाकतो. निश्चित मर्यादा राखून अशा प्रकारची सूट असावी, असे माझे मत आहे. शेवटी कर्णधारालाच जबाबदारी सांभाळावी लागते. कर्णधाराच्या अधिकाराव्यतिरिक्त विराटने कुठल्याही प्रकारचा प्रभाव टाकला, अशी तक्रार घेऊन माझ्याकडे कुणी आलेले नाही.’राय पुढे म्हणाले, ‘वैयिक्तक विचार करता विराटचा माझ्यासोबतचा व्यवहार चांगला आहे. विराटने कुठल्या बाबीसाठी माझ्यावर कधीच दडपण निर्माण केले नाही. या व्यतिरिक्त संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीने कधीच विराटबाबत तक्रार केलेली नाही.’ एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने एकूण १३ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यामुळे कधी-कधी त्यांच्यावर दडपण निर्माण करण्यात येते, असे वाटते, पण सीओए प्रमुखांच्या मते माजी यष्टिरक्षकावर सहजपणे दडपण निर्माण करता येईल, असे वाटत नाही. राय म्हणाले, ‘निवड समितीवर दडपण निर्माण करण्यात आले, अशी मला कधी माहिती मिळाली नाही. मी एमएसकेचा आदर करतो. एमएसके कुणापुढे गुडघे टेकत नाही. तो वरिष्ठ असून स्टार खेळाडूंना चांगले हाताळतो.’ (वृत्तसंस्था)राय यांनी कोहलीला अफगाणिस्तान कसोटी ऐवजी सरेतर्फे कौंटी क्रिकेट खेळण्यास परवानगी देण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. राय पुढे म्हणाले,‘मी सुरुवातीपासून नीतिगत निर्णयांमध्ये सामील असतो.दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिकेत १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. संघाला तेथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास वेळ मिळाला नसल्याची टीका झाली.संघव्यवस्थापनासोबत याबाबत चर्चा झाली. त्यात भारत ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडही सामील झाले होते. त्यात आमच्या खेळाडूंना लवकर जाऊन मालिकेसाठी सज्ज होण्याची योजना तयार करण्यात आली. या व्यतिरिक्त अफगाणिस्तानचे सीईओ (शाफिक स्टेनिकजई) यांनीही आमच्या निर्णयाचे समर्थन करताना आम्ही भारतासोबत खेळत असून विराट कोहलीसोबत नाही, असे वक्तव्य केले.’दिवस-रात्र कसोटी सामना न खेळण्याचा निर्णय खेळाडूंसह चर्चा केल्यानंतर घेण्यात आला, असेही राय यांनी यावेळी स्पष्ट केले.राय म्हणाले, ‘सर्वच संघ जिंकण्यासाठी खेळतात. कदाचित ५० वर्षांपूवी भारतीय संघ सामना अनिर्णीत राखण्यासाठी खेळत असेल. आमच्याकडे चांगला संघ आहे. आम्ही ठरविलेले लक्ष्य (इंग्लंड व आॅस्ट्रेलियात कसोटी मालिका, २०१९ विश्वकप जिंकणे) साधण्यास प्रयत्नशील आहोत.’ राय पुढे म्हणाले,‘प्रशिक्षक रवी शास्त्री १२ एप्रिलला आम्हाला भेटले. त्यांनी सांगितले की, संघाने सध्या दुसºया गोष्टीवर (विश्वकप) लक्ष केंद्रित केले आहे.’

टॅग्स :विराट कोहली