Join us  

तेव्हापासून वडिलांचे आॅटोरिक्षा चालविणे थांबले...

नवी दिल्ली : वडील आॅटोरिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा ओढायचे. माझ्या क्रिकेट सरावात त्यांनी कधी व्यत्यय येऊ दिला नाही, पोटाला चिमटा देत क्रिकेटचे साहित्य घेऊन दिले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 4:43 AM

Open in App

नवी दिल्ली : वडील आॅटोरिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा ओढायचे. माझ्या क्रिकेट सरावात त्यांनी कधी व्यत्यय येऊ दिला नाही, पोटाला चिमटा देत क्रिकेटचे साहित्य घेऊन दिले. तुम्हाला फार काळ आॅटोरिक्षा चालवू देणार नाही,असे मी वडिलांना वारंवार म्हणायचो. आयपीएलचा २ कोटी ६० लाखांचा पहिलाच करार मिळाल्याबरोबर मी माझा शब्द खरा ठरविला. तेव्हापासून कधीही आॅटो चालवू दिलेला नाही, असे भारतीय संघात निवड झालेला २३ वर्षांचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सांगितले.सनराइजर्स हैदराबादने सिराजला पहिल्यांदा करारबद्ध केले. तेव्हापासून सिराजने वडील मोहम्मद गौस यांचे काबाडकष्ट बंद केले. आज कुटुंबाची जबाबदारी स्वीकारल्याचे आणि भाड्याचे घर सोडून हक्काच्या घरात राहायला आल्याचे समाधान सिराजच्या चेहºयावर दिसले. पहिला करार मिळताच मी वडिलांना विश्रांती घेण्यास सांगितले.तेव्हापासून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची सिराज स्वत: काळजी घेत आहे. भारतीय अ संघातून चमकदार कामगिरी करणाºया सिराजला इतक्या लवकर राष्ट्रीय संघात स्थान मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. कर्नाटककडून रणजी खेळण्याची तयारी करीत असलेल्या सिराजचा आनंद ओसंडून वाहात होता. तो म्हणाला,‘आनंद व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत.