Join us

त्यामुळेच मनोबल वाढले, भारताविरुद्ध दारुण पराभवानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षकाचे मत

भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंका संघाचे मनोबल वाढल्याचे मनोगत या संघाचे कोच निक पोथास यांनी व्यक्त केले आहे. पराभवामुळे आमचा संघ बलाढ्य झाला असून याचा लाभ पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरीसाठी निश्चितपणे होईल, असा विश्वासही पोथास यांनी व्यक्त केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 04:15 IST

Open in App

कोलंबो : भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंका संघाचे मनोबल वाढल्याचे मनोगत या संघाचे कोच निक पोथास यांनी व्यक्त केले आहे. पराभवामुळे आमचा संघ बलाढ्य झाला असून याचा लाभ पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरीसाठी निश्चितपणे होईल, असा विश्वासही पोथास यांनी व्यक्त केला.द. आफ्रिकेचे माजी आंतरराष्टÑीय खेळाडू असलेले पोथास संघासोबत संयुक्त अरब अमिरातकडे रवाना होण्यापूर्वी म्हणाले,‘२८ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या दौºयातील सामने पुढील महिन्यात खेळले जातील. भारताविरुद्धच्या पराभवाने आम्हाला आणखी भक्कम बनविले आहे. पहिल्या कसोटीआधी नकारात्मक भाव मनातून काढून टाकण्याचे निर्देश संघाला देण्यात आले आहेत.’ दारुण पराभवावर श्रीलंकेतील मीडियाने क्रिकेट संघांवर टीका करणे अद्यापही सुरू ठेवले आहे. यावर पोथास पुढे म्हणाले,‘मीडिया तुमच्याविरुद्ध लिहित असेल तर उत्तर द्यायला तुमच्याकडे पर्याय आहे. जगभरातील खेळाडूंसोबत हे घडत असते. कुणी तुमच्यावर नेम साधत असेल तर तुम्ही माघार घेऊ शकता किंवा स्वत:च्या कामगिरीतून हे चुकीचे असल्याचे सिद्ध करू शकता.’ (वृत्तसंस्था)>घरच्या मैदानावर झाला दारुण पराभवभारताविरुद्ध मालिकेत लंकेचा घरच्या मैदानावर दारुण पराभव झाला. तिन्ही प्रकारात या संघाने एकूण नऊ सामने गमावले होते. या ‘व्हाईटवॉश’मुळे पाकिस्तानविरुद्ध पुढील महिन्यात आयोजित दोन कसोटी, ५ एकदिवसीय व ३ टी-२० सामन्यांच्या आंतरराष्टÑीय मालिकेत खेळताना आमचा संघ अधिक बलाढ्य झाला असल्याचे पोथास यांनी म्हटले आहे.