नवी दिल्ली : कोलकाता येथे झालेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने बलाढ्य आॅस्ट्रेलिया ५० धावांनी सहज लोळवल्यानंतर आयसीसी क्रमवारीतही प्रगती करताना थेट अव्वल स्थानी झेप घेतली. यासह, आता कसोटीसोबतच, एकदिवसीय क्रमवारीमध्येही भारतीय संघ अव्वल स्थानी पोहचला आहे.
या सामन्याआधी एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेहून एका स्थानाने मागे द्वितीय स्थानी होता. त्याचवेळी, पहिल्या सामन्यातील पराभवानंतर विश्वविजेत्या आॅस्ट्रेलिया संघाची तिस-या स्थानी घसरण झाली होती. जर, भारताने दुसरा सामना गमावला असता, तर त्यांची थेट तिसºया स्थानी घसरण झाली असती आणि आॅस्ट्रेलियाने दुसरे स्थान काबिज केले असते. नव्या क्रमवारीनुसार इंग्लंड आणि न्यूझीलंड अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत.
सध्या भारतीय संघाचे एकूण १२० गुण असून दुसºया स्थानी घसरलेल्या दक्षिण आफ्रिकेचे ११९ गुण आहेत. तिसºया स्थानवर असलेल्या आॅस्टेÑलियाच्या खात्यामध्ये ११४ गुणांची नोंद आहे. दरम्यान, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारताकडे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थान पटकावण्याची नामी संधी आहे. (वृत्तसंस्था)
>भारताला मोठी संधी
आॅस्टेÑलियानंतर भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धही मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. या दोन्ही संघाविरुद्ध एकदिवसीय व टी२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखल्यास टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थानी येण्याचा पराक्रम करेल.