Hardik Pandya लवकरच गोलंदाजी करेल, पण कधी?; विराट कोहली भरून काढेल का सहाव्या गोलंदाजाची उणीव?

हार्दिक पांड्याची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात ऑलराऊंडर म्हणून निवड झाली आणि शार्दूल ठाकूरची निवड होण्यापूर्वी संघात तो एकमेव जलदगती गोलंदाज व फलंदाज असा ऑलराऊंडर  होता.

By स्वदेश घाणेकर | Published: October 20, 2021 04:38 PM2021-10-20T16:38:51+5:302021-10-20T16:39:58+5:30

T20 World Cup : When we are were waiting for Hardik Pandya the bowler we got to see Virat Kohli the bowler  | Hardik Pandya लवकरच गोलंदाजी करेल, पण कधी?; विराट कोहली भरून काढेल का सहाव्या गोलंदाजाची उणीव?

Hardik Pandya लवकरच गोलंदाजी करेल, पण कधी?; विराट कोहली भरून काढेल का सहाव्या गोलंदाजाची उणीव?

Next

T20 World Cup : हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीतून सावरून मैदानावर उतरला आहे आणि त्याला पूर्णपणे तंदुरूस्त होण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. तो आजही गोलंदाजी करण्यासाठी फिट नाही, परंतु तो लवकरच गोलंदाजी करेल.  मी, विराट कोहली, सूर्यकुमार आमचा गरज पडल्यास सहावा गोलंदाज म्हणून वापर होऊ शकतो ( मोठ्यानं हसला). पण, आमच्याकडे ५ तुल्यबळ गोलंदाज आहेत. बघु पुढे काय होतं ते, आजच्या India vs Australia Warm Up Match आधी रोहित शर्माचे हे वक्तव्य खऱ्या अर्थानं टीम इंडियाची चिंता वाढवणारे आहे. 

हार्दिक पांड्याची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात ऑलराऊंडर म्हणून निवड झाली आणि शार्दूल ठाकूरची निवड होण्यापूर्वी संघात तो एकमेव जलदगती गोलंदाज व फलंदाज असा ऑलराऊंडर  होता. अक्षर पटेल, रवींद्र जडेजा व आर अश्विन हेही अष्टपैलू संघात आहेतच. पण, टीम इंडियाला जलदगती गोलंदाज असलेल्या हार्दिकची उणीव जाणवणार हे नक्की आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आणि त्याचदरम्यान आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यालाही सुरुवात झाली. त्यामुळे वर्ल्ड कप संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर सारेच बारकाईनं नजर ठेऊन होते. हार्दिकवर जरा अधिकच...  दुखापतीतून सावरल्यानंतर तो श्रीलंका दौऱ्यावर गेला, परंतु तेथे त्यानं गोलंदाजी केली नाही आणि फलंदाजीतही फार कमाल दाखवली नाही.

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सनं हार्दिकला ओझं म्हणून संपूर्ण लीगमध्ये खांद्यावर बसवून ठेवले. त्याचा गोलंदाज म्हणून उपयोग झाला तर नाहीच, परंतु फलंदाज म्हणूनही तो ग्रेट काही करू शकला नाही. तेव्हाच निवड समितीचे माजी प्रमुख एमएसके प्रसाद यांनी भारताला ही चूक निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मेंटॉरच्या भूमिकेत असलेल्या महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) शार्दूलची राखीव खेळाडूमधून मुख्य संघात निवड करावी अशी मागणी केली. आता हार्दिकला एक सक्षम पर्याय टीम इंडियाकडे आहे. पण, इथे आयपीएलसारखे १४ नाही, तर पाच सामन्यांतच भवितव्य ठरणार आहे आणि टीम इंडिया हार्दिकचं ओझं कितीकाळ खांद्यावर वाहणार आहे?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं गोलंदाजी केली, परंतु हार्दिकच्या बचावासाठी हा योग्य मार्ग ठरत नाही. आजच्या सामन्यातील कर्णधार रोहितच्या मते भारताकडे पाच सक्षम गोलंदाज आहेत आणि तेच पुरेसे आहेत. पण, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह हे वगळता भुवनेश्वर कुमारचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहेच, इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात भुवीनं ४ षटकांत ५४ धावा दिल्या. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. त्यात अश्विन ४ वर्षांनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघात परतला आहे. अशात सहाव्या गोलंदाजाचे महत्त्व व जबाबदारी अधिक वाढते. ती विराट, रोहित, सूर्यकुमार यांच्या गोलंदाजीनं पूर्ण करता येऊ शकत नाही.
 

Web Title: T20 World Cup : When we are were waiting for Hardik Pandya the bowler we got to see Virat Kohli the bowler 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app