Join us  

टी२० मुंबई : अंधेरीकरांनी दिली विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 3:21 AM

Open in App

मुंबई - इक्बाल अब्दुल्लाच्या नेतृत्त्वाखाली खेळणाºया आकर््स संघाने पहिल्या टी२० मुंबई लीग स्पर्धेत विजयी सलामी देताना स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील नॉर्थ मुंबई पँथर्स संघाचा २३ धावांनी पराभ केला. प्रथम फलंदाजी करताना अंधेरीकरांनी निर्धारीत २० षटकात ७ बाद १६४ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना नॉर्थ मुंबईचा डाव १९.१ षटकात १४१ धावांमध्ये संपुष्टात आला.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून नॉर्थ मुंबईचा कर्णधार रहाणे याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नॉर्थ मुंबईच्या गोलंदाजांनी अंधेरीची तिसºया षटकात ४ बाद १६ अशी अवस्था करत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविला. यावेळी नॉर्थ मुंबई आपला फास आवळणार असेच चित्र होते. मात्र, शुभम रांजणे (६५) आणि पराग खानापूरकर (६१) यांनी निर्णायक अर्धशतक झळकावर संघाला समाधानकारक मजल मारुन दिली.या आव्हानाचा पाठलाग करताना नॉर्थ मुंबईची मुख्य मजल रहाणे आणि युवा विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ या सलामीवीरांवर होती. परंतु, पृथ्वीला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. तो चाचपडताना दिसला. अंदाज चुकत असल्याने त्याला खेळताना अडचण येत होती, यातंच त्याच्यावरील दडपण वाढले आणि एक आक्रमक फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद झाल्याने नॉर्थ मुंबईला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार रहाणेने २२ चेंडूत ५ चौकारांसह २८ धावा केल्या. मधल्या फळीतील यशस्वी जैसवालने २३ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह ३७ धावा फटकावत संघाच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने दडपणाखाली येऊन तोही परतला. तुषार देशपांडेने २५ धावांत ३ आणि विनीत सिन्हा व शुभम रांजणे यांनी प्रत्येकी २ बळी घेत नॉर्थ मुंबई संघाला रोखण्यात मोलाचे योगदान दिले.तत्पूर्वी, ४ बाद १६ धावा अशी अत्यंत खराब अवस्था असताना फलंदाजीला आलेल्या शुभम आणि पराग यांनी पाचव्या बळीसाठी ११७ धावांची निर्णायक भागिदारी करुन सामना नॉर्थ मुंबईच्या हातून हिसकावला. शुभमने ५० चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ६५ धावा चोपल्या. तसेच परागने ३८ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांचा तडाखा दिला. हे दोघे पाठोपाठच्या षटकात बाद झाल्यानंतर सिद्धार्थ चिटणीसने ११ चेंडूत नाबाद १७ धावा करत संघाला दिडशेच्या पलिकडे मजल मारुन दिली. शिवम मल्होत्रा आणि राकेश प्रभू यांनी प्रत्येकी ३ बळी घेत अंधेरीला रोखण्याचा चांगला प्रयत्न केला.संक्षिप्त धावफलक :आकर््स अंधेरी : २० षटकात ७ बाद १६४ धावा (शुभम रांजणे ६५, पराग खानापूरकर ६१; राकेश प्रभू ३/२०, शिवम मल्होत्रा ३/४१) वि.वि. नॉर्थ मुंबई पँथर्स : १९.१ षटकात सर्वबाद १४१ धावा (यशस्वी जयस्वाल ३७, अजिंक्य रहाणे २८; तुषार देशपांडे ३/२५, शुभम रांजणे २/१८, विनीत सिन्हा २/२१)

टॅग्स :क्रिकेटमुंबई