वाडेकर यांच्याबरोबर सोबर्स यांनी निभावले होते असे स्पोर्ट्समन स्पिरिट

भारत आणि वेस्ट इंडिज यांचा वानखेडेवर एक कसोटी सामना होता. सामन्यापूर्वी दोन्ही संघ सराव करत होते. वाडेकर यांचा सराव पाहून वेस्ट इंडिजचे कर्णधार सर गॅरी सोबर्स भारावले होते.

By प्रसाद लाड | Updated: August 16, 2018 00:21 IST2018-08-16T00:21:31+5:302018-08-16T00:21:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sportsman Spirit, who was accompanied by Wadekar along with Sobers | वाडेकर यांच्याबरोबर सोबर्स यांनी निभावले होते असे स्पोर्ट्समन स्पिरिट

वाडेकर यांच्याबरोबर सोबर्स यांनी निभावले होते असे स्पोर्ट्समन स्पिरिट

मुंबई - भारत आणि वेस्ट इंडिज यांचा वानखेडेवर एक कसोटी सामना होता. सामन्यापूर्वी दोन्ही संघ सराव करत होते. वाडेकर यांचा सराव पाहून वेस्ट इंडिजचे कर्णधार सर गॅरी सोबर्स भारावले होते. पण सर्व करताना ते वाडेकर यांना ते शाबासकी देऊ शकत नव्हते.
सराव करताना वाडेकर चांगले फटके मारत होते. पण त्यांचा पायाची हालचाल चांगली होत नव्हती. त्यावेळी सोबर्स यांनी पाहिले की वाडेकर यांचे बूट चांगल्या स्तीतीमध्ये नाहीत. 
सराव संपला. वेस्ट इंडीचचे खेळाडू हॉटेलमद्ये गेले, तर भारताचे काही खेळाडू थोड्यावेळासाठी घरी गेले होते. वाडेकर घरी पोहोचले आणि त्यांना समजलं की त्यांच्यासाठी कोणी तरी एक माणूस गिफ्ट घेऊन आला होता. वाडेकर यांना काहीच कळेना. त्यांनी गिफ्टचा बॉक्स हातात घेतला, तर त्यामध्ये नवे कोरे बूट होते. त्याबरोबर एक चिट्टी होती. ती सोबर्स यांनी लिहिली होती. वाडेकरांना शुभेच्छा म्हणून त्यांनी हे बूट त्यांना गिफ्ट केले होते. अशी स्पोर्ट्समन स्पिरिट असते, हे बऱ्याच जणांना माहितीही नसेल.

Web Title: Sportsman Spirit, who was accompanied by Wadekar along with Sobers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.