हॅमिल्टन : टीम साऊदी व ट्रेंट बोल्ट यांनी केलेल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दुस-या दिवशी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसºया कसोटीत आपली स्थिती मजबूत केली आहे.
न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. नील वॅगनर (०१) व टॉम ब्लंडेल (२८) हे दोघे लवकर बाद झाले. त्यानंतर बोल्ट व साऊदी यांनी शेवटच्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. साऊदीने ३९ चेंडूंत दोन षटकार व चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. बोल्टने २७ चेंडूंत ३७ धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या शेनन गॅब्रियलने ११९ धावांत चार बळी घेतले.
फलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर साऊदीने ३४ धावांत दोन, तर बोल्टने ६७ धावांत दोन बळी घेत विंडीजच्या डावाला
खिंडार पाडले. दिवसअखेर वेस्ट इंडिजच्या आठ बाद २१५ धावा झाल्या होत्या. रेमन रीफर २२, तर मिगुएल कमिस १० धावांवर खेळत आहेत. वेस्ट इंडिज अजून १५८ धावांनी पिछाडीवर आहे. पावसामुळे सुमारे ९० मिनिटे खेळ थांबवावा लागला होता. (वृत्तसंस्था)