Join us  

दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे कसोटी नव्या नियमांप्रमाणे

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यादरम्यान मंगळवारपासून प्रारंभ होणारा एकमेव दिवस-रात्र कसोटी सामना प्रायोगिक तत्त्वावर नव्या नियमांनुसार खेळला जाणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 2:57 AM

Open in App

पोर्ट एलिझाबेथ : दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यादरम्यान मंगळवारपासून प्रारंभ होणारा एकमेव दिवस-रात्र कसोटी सामना प्रायोगिक तत्त्वावर नव्या नियमांनुसार खेळला जाणार आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला चारदिवसीय कसोटी सामन्याच्या आयोजनाची परवानगी दिली आहे. कसोटी खेळण्यासाठी जे नियम आहेत त्या तुलनेत हे नियम एकदम वेगळे आहेत.सामना चार दिवसांचा राहणार असून प्रत्येक दिवशी साडेसहा तासांचा खेळ होईल. पाच दिवसांच्या सामन्यात सहा तासांचा खेळ होतो. ९० ऐवजी प्रत्येक दिवशी ९८ षटके टाकली जातील. पाच दिवसांच्या सामन्याप्रमाणे षटके पूर्ण करण्यासाठी अर्ध्या तासाचा खेळ वाढविला जाऊ शकतो. पाच दिवसांच्या सामन्यात फॉलोआॅन २०० धावांच्या आघाडीवर दिला जातो, पण यात १५० धावांच्या आघाडीवर फॉलोआॅन दिला जाऊ शकतो. प्रत्येक दिवशी खेळ स्थानिक वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.१९७२-७३ नंतर प्रथमच कसोटी सामन्यासाठी चार दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी कसोटी सामने तीन ते सहा दिवसांपर्यंत खेळल्या जात होते. काही कसोटी सामन्यात तर वेळेचे बंधन नव्हते आणि त्यांना ‘टाइमलेस’टेस्ट म्हटले जाते.अखेरचा टाइमलेस कसोटी सामना दक्षिण आफ्रिका व इंग्लंड यांच्यादरम्यान डर्बनमध्ये १९३८-३९ मध्ये खेळल्या गेला. विशेष म्हणजे हा सामना १० दिवस (त्यात एक दिवस पावसामुळे खेळ शक्य झाला नाही) चालला आणि तरी अनिर्णीत संपला. कारण इंग्लंड संघाला मायदेशी परतायचे होते.सर्व कसोटी सामने १९७२-७३ पासून पाच दिवसांचे व्हायला लागले. अपवाद आॅस्ट्रेलिया व विश्व एकादश यांच्यादरम्यान २००५-०६ मध्ये खेळल्या गेलेला कसोटी सामना मात्र सहा दिवसांचा होता, पण ही लढत चार दिवसांमध्ये संपली होती.दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे हा आठवा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. दक्षिण आफ्रिकेत अशा प्रकारे खेळला जाणारा पहिला सामना राहील. गेल्या सात दिवस-रात्र कसोटी सामन्यांपैकी चार सामने आॅस्ट्रेलियात खेळले गेले.खेळाचे पहिले दोन सत्र दोन तासांऐवजी २.१५ तासांचे राहील. पहिल्या सत्रानंतर उपाहाराऐवजी २० मिनिटांचा टी-ब्रेक राहील. दुसºया सत्रानंतर ४० मिनिटांचा डीनर ब्रेक राहील. एखाद्या दिवशी वेळ वाया गेल्यामुळे दुसºया दिवशी लवकर खेळ सुरू करण्याचा किंवा अधिक षटके टाकण्याचे प्रयोजन नाही.