Join us  

दक्षिण आफ्रिका ‘बेहत्तर’, भारतीय संघाचा ७२ धावांनी पराभव

गोलंदाजांनी निर्माण केलेल्या विजयाच्या संधीवर आघाडीच्या फलंदाजांनी पाणी फेरल्याने टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७२ धावांनी पराभवास सामोरे जावे लागले. या शानदार विजयासह यजमानांनी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 3:59 AM

Open in App

केपटाऊन : गोलंदाजांनी निर्माण केलेल्या विजयाच्या संधीवर आघाडीच्या फलंदाजांनी पाणी फेरल्याने टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७२ धावांनी पराभवास सामोरे जावे लागले. या शानदार विजयासह यजमानांनी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव केवळ १३५ धावांमध्ये संपुष्टात आला.न्यू लँड्सच्या मैदानावर झालेल्या या सामन्यातील तिसरा दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम मारा करताना यजमानांचा दुसरा डाव केवळ १३० धावांत गुंडाळला. यामुळे पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या भारतीयांना सामना विजयासाठी २०८ धावांचे आव्हान मिळाले. मात्र, वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल बनलेल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. घरच्या मैदानावर धावांचा डोंगर उभारलेल्या भारतीय फलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन-मुरली विजय यांनी ३० धावांची सलामी देत भारताला अपेक्षित सुरुवात करून दिली. मात्र, मॉर्नी मॉर्केल याने धवनला बाद करून भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला आणि यानंतर ठराविक अंतराने एक-एक फलंदाज बाद होत गेले. धवनने २० चेंडूंत २ चौकारांसह १६, तर विजयने ३२ चेंडूंत २ चौकारांसह १३ धावा केल्या. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांच्यावर मुख्य मदार होती. परंतु, पुजाराचा (४) मॉर्केलच्या बाहेर जाणाºया चेंडूवर अंदाज चुकला आणि यष्टिरक्षक क्विंटन डीकॉकने त्याचा झेल घेत भारताला मोठा झटका दिला.कर्णधार कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने ४ चौकार मारत भारताच्या आशाही उंचावल्या. परंतु, दुसºया डावात भेदक गोलंदाजी करून भारतीयांची दाणादाण उडवलेल्या वेर्नोन फिलँडर याने कोहलीचा बळी मिळवत संघाला आत्मविश्वास मिळवून दिला. कोहली ४० चेंडूंत २८ धावा काढून परतला. यानंतर रोहित शर्मा (१०), वृद्धिमान साहा (८), पहिल्या डावात भारताला सावरणारा हार्दिक पंड्या (१) हे झटपट परतले. रविचंद्रन आश्विन याने ५३ चेंडंूत ५ चौकारांसह झुंजार ३७ धावांची खेळी करून भारताच्या आशा पुन्हा उंचावल्या. त्याने भुवनेश्वर कुमारसह (१३*) ४९ धावांची दमदार भागीदारीही केली. परंतु, पुन्हा फिलँडरने निर्णायक बळी मिळवताना आश्विनला बाद केले.यानंतर मोहम्मद शमी (४) आणि जसप्रीत बुमराह (०) आल्यापावली परतल्याने भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले. फिलँडरने ४२ धावांत ६ बळी घेत भारताला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. मॉर्केल आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी २ बळी घेत फिलँडरला चांगली साथ दिली. तत्पूर्वी, २ बाद ६५ धावसंख्येवरून चौथ्या दिवसाची सुरुवात केलेल्या दक्षिण आफ्रिकेने आपले अखेरचे ८ बळी ६५ धावांत गमावले. अनुभवी मोहम्मद शमी (३/२८) आणि युवा जसप्रीत बुमराह (३/२९) यांनी भेदक मारा करत यजमानांना झटपट गुंडाळले. भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या यांनीही प्रत्येकी २ बळी घेत चांगला मारा केला. परंतु, भारतीय फलंदाजांना गोलंदाजांनी निर्माण केलेली संधी साधण्यात यश आले नाही. सलामीवीरएडेन मार्कराम (३४) आणि धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स (३५) यांनी यजमानांना समाधानकारक मजल मारून दिली.(वृत्तसंस्था)धावफलक :दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ७३.१ षटकांत सर्व बाद २८६ धावा.भारत (पहिला डाव) : ७३.४ षटकात सर्व बाद २०९ धावा.दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : एडेन मार्कराम झे. भुवनेश्वर गो. हार्दिक ३४, डीन एल्गर झे. साहा गो. हार्दिक २५, कागिसो रबाडा झे. कोहली गो. शमी ५, हाशिम आमला झे. रोहित गो. शमी ४, एबी डिव्हिलियर्स झे. भुवनेश्वर गो. बुमराह ३५, फाफ डूप्लेसिस झे. साहा गो. बुमराह ०, क्विंटन डीकॉक झे. साहा गो. बुमराह ८, वेर्नोन फिलँडर पायचीत गो. शमी ०, केशव महाराज झे. साहा गो. भुवनेश्वर १५, मॉर्नी मॉर्केल झे. साहा गो. भुवनेश्वर २, डेल स्टेन नाबाद ०. अवांतर - ४१.२ षटकात सर्व बाद १३० धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ११-५-३३-२; जसप्रीत बुमराह ११.२-१-३९-३; मोहम्मद शमी १२-३-२८-३; हार्दिक पंड्या ६-०-२७-२; रविचंद्रन आश्विन १-०-३-०.भारत (दुसरा डाव) : मुरली विजय झे. एबी गो. फिलँडर १३, शिखर धवन झे मॉरिस व गो. मॉर्नी मॉर्केल १६, चेतेश्वर पुजारा झे. डीकॉक गो. मॉर्केल ४, विराट कोहली पायचीत गो. फिलँडर २८, रोहित शर्मा त्रि. गो. फिलँडर १०, वृद्धिमान साहा पायचीत गो. रबाडा ८, हार्दिक पंड्या झे. एबी गो. रबाडा १, रविचंद्रन आश्विन झे. डीकॉक गो. फिलँडर ३७, भुवनेश्वर कुमार नाबाद १३, मोहम्मद शमी झे. प्लेसिस गो. फिलँडर ४, जसप्रीत बुमराह झे. प्लेसिस गो. फिलँडर ०. अवांतर - १. एकूण : ४२.४ षटकांत सर्व बाद १३५ धावा.बाद क्रम : १-३०, २-३०, ३-३९, ४-७१, ५-७६, ६-७७, ७-८२, ८-१३१, ९-१३५, १०-१३५.गोलंदाजी : वेर्नोन फिलँडर १५.४-४-४२-६; मॉर्नी मॉर्केल ११-१-३९-२; कागिसो रबाडा १२-२-४१-२; केशव महाराज ४-१-१२-०.आम्ही सुमारे ७० धावांनी हरलो. जर पहिल्या डावातील संधी वाया घालवल्या नसत्या, तर आफ्रिकेला २२० च्या आसपास रोखले असते. थोड्या अंतराने अनेक बळी गेल्याने आमची स्थिती खराब झाली. आम्ही तिन्ही दिवशी सामन्यात आव्हान राखून होतो आणि हा एक शानदार सामना होता. धावांचा पाठलाग करताना एकाला तरी ७०-८० धावा करण्याची आवश्यकता होती. त्यांच्याकडे एक गोलंदाज कमी होता, पण त्यांनी अचूक टप्प्यावर मारा केला. आम्हालाही आमच्या चुका सुधारण्याची आवश्यकता आहे.- विराट कोहली, कर्णधार, भारतया सामन्यात आम्ही दरवेळी प्रतिकूल परिस्थितीत चांगले प्रदर्शन केले. ज्या प्रकारे आम्ही झुंजार खेळ केला ते शानदार होते. भारताच्या चांगल्या गोलंदाजीनंतरही आम्ही स्वत:वर दबाव येऊ दिला नाही. माझ्या मते २७० धावसंख्या चांगली होती, पण पंड्याने यानंतर धाडसी खेळी केली. पुन्हा एकदा गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. दुसºया डावात २०० च्या पुढे जाऊन ३५० धावांच्या आसपास आघाडी घेण्याची आमची योजना होती. दुसºया डावात ज्या प्रकारे चेंडू येत होते ते आश्चर्यजनक होते.- फाफ डू प्लेसिस, कर्णधार, दक्षिण आफ्रिका

टॅग्स :क्रिकेट