Join us  

शिखर धवनचा शतकी तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 3:03 AM

Open in App

पल्लेकल : सलामीवीर फलंदाज शिखर धवनचे सहावे कसोटी शतक आणि त्याने लोकेश राहुलसोबत सलामीला केलेल्या १८८ धावांच्या भागीदारीनंतर भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे यजमान श्रीलंकेने आजपासून प्रारंभ झालेल्या तिसºया व अखेरच्या कसोटी सामन्यात दिवसअखेर पाहुण्या संघाला ६ बाद ३२९ धावांत रोखले. शनिवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी १३ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या रिद्धिमान साहा याला हार्दिक पांड्या (१) साथ देत होता. श्रीलंकेतर्फे डावखुरा फिरकीपटू मलिंडा पुष्पकुमार सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १८ षटकांत ४० धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर चायनामन लक्षण संदाकनने ८४ धावांत २ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. विश्व फर्नांडो याने एक बळी घेतला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाºया भारतीय संघाची सुरुवात शानदार झाली. पहिल्या सत्रात भारतीय सलामीवीरांनी वर्चस्व गाजवले. श्रीलंकेला ही जोडी फोडण्यासाठी दुसºया सत्राची प्रतीक्षा करावी लागली. उपाहारानंतर श्रीलंकेने दमदार पुनरागमन करताना दुसºया व तिसºया सत्रांत प्रत्येकी ३ बळी घेतले.फॉर्मात असलेला चेतेश्वर पुजारा (८), गेल्या कसोटीतील शतकवीर अजिंक्य रहाणे (१७) यांना मोठी खेळी करता आली नाही, तर कर्णधार विराट कोहली (४२) जम बसल्यानंतर बाद झाला.कोहली डावाच्या ७९ व्या षटकात संदाकनच्या गुड लेंथ चेंडूवर स्लिपमध्ये तैनात करुणारत्नेकडे झेल देत माघारी परतला. रविचंद्रन अश्विन (३१) दिवसअखेर विश्व फर्नांडोचा बळी ठरला.अश्विन व डीआरएसच्या अपीलमधून बचावलेला साहा यांनी ८१ व्या षटकांत भारताला तीनशेचा पल्ला ओलांडून दिला. या दोघांनी दुसºया नव्या चेंडूला यशस्वीपणे सामोरे जाताना सहाव्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली. भारतीय संघ रविवारी दुसºया दिवशी चारशेचा पल्ला गाठण्यासाठी प्रयत्नशील राहील.राहुलला पुन्हा एकदा कसोटी शतकाची हुलकावणी मिळाली. ४० व्या षटकात डावखुरा फिरकीपटू पुष्पकुमारच्या चेंडूवर मिड आॅनवर तैनात दिमुथ करुणारत्नेला झेल देत तो माघारी परतला. त्याने १३५ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार लगावले. दुसºया टोकावर धवनने मात्र धावफलक हलता ठेवला. त्याने १०७ चेंडूंमध्ये मालिकेतील दुसरे शतक झळकावले. त्याने पुजारासोबत ३१ धावांची भागीदारी केली. तो बाद होणार दुसरा फलंदाज ठरला. पुष्पकुमारच्या गोलंदाजीवर धवनचा उडालेला झेल स्क्वेअर लेगला कर्णधार दिनेश चंदीमलने टिपला. धवनने १२३ चेंडूंमध्ये १७ चौकार ठोकले.पुजारा आज चाचपडत खेळत असल्याचे दिसून आले. ५१ व्या षटकांत संदाकनने त्याला बाद केले. तिसºया सत्रात रहाणे चुकीचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. पुष्पकुमारने त्याला क्लीन बोल्ड केले.राहुल व धवन यांनी सकाळच्या सत्रात श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारताने उपाहारापर्यंत बिनबाद १३४ धावांची मजल मारली होती. या दोघांनी पहिल्या सत्रात १५ चौकार लगावले. १० व्या षटकात त्यांनी भारताला ५५ चेंडूंमध्ये ५० धावांचा तर १०७ चेंडूंमध्ये १०० धावांचा पल्ला गाठून दिला. राहुलने ६७ चेंडूंमध्ये चार चौकार ठोकत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. त्याआधी, भारताने निलंबित रवींद्र जडेजाच्या स्थानी कुलदीप यादवला संघात स्थान दिले. (वृत्तसंस्था)राहुलने साधली विश्वविक्रमाची बरोबरीअ‍ॅण्डी फ्लॉवर, सर एव्हरटन व्हिक्स, शिवनारायण चंद्रपॉल, कुमार संगकारा, ख्रिस रॉजर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सलग सात अर्धशतके नोंदवण्याची कामगिरी केली आहे. लोकेश राहुलने आज या विक्रमाची बरोबरी साधली. राहुलचे कसोटी क्रिकेटमधील हे सलग सातवे अर्धशतक ठरले. त्याने गुंडप्पा विश्वनाथ व राहुल द्रविड यांचा विक्रम मोडला. त्यांच्या नावावर सलग सहा अर्धशतकांची नोंद आहे.प्रभाकर-सिद्धू यांचा विक्रम मोडलाधवन (११९) व लोकेश राहुल (८५) यांनी सलामीला १८८ धावांची भागीदारी करीत भारताला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी १९९३ मध्ये मनोज प्रभाकर व नवज्योतसिंग सिद्धू यांनी श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत सलामीला नोंदविलेल्या १७३ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला.धा व फ ल कभारत पहिला डाव : शिखर धवन झे. चांदीमल गो. पुष्पकुमार ११९, लोकेश राहुल झे. करुणारत्ने गो. पुष्पकुमार ८५, चेतेश्वर पुजारा झे. मॅथ्यूज गो. संदाकन ८, विराट कोहली झे. करुणारत्ने गो. संदाकन ४२, अजिंक्य रहाणे त्रि.गो. पुष्पकुमार १७, रविचंद्रन अश्विन झे. डिकवेला गो. विश्व फर्नांडो ३१, रिद्धिमान साहा खेळत आहे १३, हार्दिक पांड्या खेळत आहे १ अवांतर १३, एकूण ९० षटकांत ६ बाद ३२९ धावा. गडी बाद क्रम : १/१८८, २/२१९, ३/२२९, ४/२६४, ५/२९६, ६/३२२. गोलंदाजी : विश्व फर्नांडो १९-२-६८-१, लाहिरू कुमार १५-१-६७-०, दिमुथ करुणारत्ने ५-०-२३-०, दिलरुवान परेरा ८-१-३६-०, लक्षण संदाकन २५-२-८४-२, मलिंडा पुष्पकुमार १८-२-४०-३.