Join us  

शामीची पत्नी हसीन जहाँ, 'या' क्रिकेटपटूंच्या बायकांशीही भांडत होती

हसीन सुरुवातीला या क्रिकेपटूंच्या बायकांबरोबर अदबीने वागायची. त्यांच्याकडून काही माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करायची. कालांतराने तिला आपण पेज-3 कल्चरमधल्या अभिनेत्री आहोत, असेच वाटायला लागले.

By प्रसाद लाड | Published: March 11, 2018 6:27 PM

Open in App
ठळक मुद्देभारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर गंभीर आरोप करणारी त्याची पत्नी हसीन जहाँ ही काही स्वत: साधी, भोळी नव्हतीच...

प्रसाद लाड :  भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर गंभीर आरोप करणारी त्याची पत्नी हसीन जहाँ ही काही स्वत: साधी, भोळी नव्हतीच... काही लोकांच्या वक्तव्यामुळे हसीन सध्या टीकेची धनी ठरत आहे. त्याचबरोबर हसीन ही किती भांडखोर होती, हेदेखील आता साऱ्यांपुढे येत आहे.

शामीवर गंभीर आरोप केल्यावर हसीन आपण किती साळसूद आहोत, असा आव आणत होती. पण तिचा हा बुरखा पहिल्यांदा फाडला तो तिचा पहिला पती एस.के. सैफुद्दिनने. सैफुद्दिनने हसीन दहावीत असताना तिला प्रपोज केले होते. त्यानंतर दोघांनी लग्नही केले. या दोघांना दोन मुलीही आहेत. हसीन आणि सैफुद्दिन यांचा संसार चांगला सुरु होता. पण सैफुद्दिनशी लग्न केल्यावर हसीनला मॉडेलिंग करता येत नव्हते. त्यामुळे सैफुद्दिनशी काडीमोड घेण्यासाठी ती त्याच्याशी रोज वाद घालू लागली. अखेर सैफुद्दिननेही वेगळ्या होण्याच्या निर्णयाला संमती दिली.

सैफुद्दिनने हसीन आपल्याशी रोज भांडत असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितल्यावर तिच्याबाबत काही नवीन गोष्टी प्रकाशझोतात आल्या आहेत. भारतीय क्रिकेटपटूंबरोबर त्यांच्या पत्नीही परदेश दौऱ्यावर जात असतात. त्याचबरोबर त्यांची भारतातही भेट गाठ होत असते. या भेटीगाठींमध्ये हसीन सुरुवातीला सर्वांनाच चांगली व्यक्ती वाटत होती. पण कालांतराने तिने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. 

सुरुवातीला हसीनने महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीशी जवळीक वाढवली. साक्षी आपली सर्वात जवळची मैत्रिण असल्याचे तिने भासवायला सुरुवात केली. पण कालांतराने त्यांच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. साक्षीनंतर हसीनचे अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका धोपवकरबरोबरही वाद झाले. त्यानंतर भारतीय संघातील फिरकीपटू आर. अश्विनची पत्नी प्रीती नारायणन आणि गौतम गंभीरची पत्नी नताशा जैन यांच्याबरोबरही भांडण झाले होते.

"हसीन सुरुवातीला या क्रिकेपटूंच्या बायकांबरोबर अदबीने वागायची. त्यांच्याकडून काही माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करायची. कालांतराने तिला आपण पेज-3 कल्चरमधल्या अभिनेत्री आहोत, असेच वाटायला लागले. तिची साऱ्यांशी वागण्याची पद्धत बदलली. त्यानंतर बऱ्याच जणांबरोबर खटकेही उडाले. कालांतराने काही क्रिकेटपटूंच्या बायकांनी तिच्याशी बोलणेही बंद केले," अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  

टॅग्स :मोहम्मद शामी