नवी दिल्ली : बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी समितीचे प्रमुख नीरज कुमार यांनी जर गोलंदाज मोहम्मद शमीला बोर्डाच्या आचारसंहितेनुसार एखाद्या अपराधातून क्लीन चिट दिले, तरच त्याचे केंद्रीय कररात पुनरागमन होऊ शकते.
शमीची पत्नी हसीनने केलेल्या घरगुती हिंसेविषयीच्या आरोपाची पोलीस चौकशी करीत आहेत आणि त्याच्याशी बीसीसीआयला काहीही घेणे-देणे नाही. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने म्हटले, ‘बीसीसीआयच्या नियमानुसार क्रिकेटपटूंसाठी असलेली आचारसंहित ही आर्थिक देवाण-घेवाण याबाबीशी संबंधित आहे. एसीयू फक्त मोहंमदभाई आणि अलिश्बा यांच्याशी शमीच्या कथित आर्थिक देवाण-घेवाण याविषयी तपास करीत आहेत. या आरोपातून शमीला क्लीन चीट मिळाल्यास त्याचे तात्काळ केंद्रीय करारात पुनरागमन होईल.’
बीसीसीआयला शमीच्या वैयक्तिक जीवनाशी काहीही घेणे-देणे नाही, असेही संकेत पदाधिकाºयाने दिले. (वृत्तसंस्था)