Join us  

भारतीय संघ व्यवस्थापनापुढे संघ निवडीचा पेच

टीम इंडिया अव्वल आहे, याचा अर्थ जागतिक विजेता होत नाही. त्यासाठी भारताला ही स्पर्धा जिंकावी लागेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 2:06 AM

Open in App

- अयाझ मेमन (कन्सल्टिंग एडिटर लोकमत)कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीवर नजर टाकल्यास वेस्ट इंडिजचा संघ थोडा कमजोर मानला जातो. पण आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पुढील २ वर्षांपर्यंत होणाऱ्या कसोटी मालिका या स्पर्धेचा भाग असतील. त्यामुळे प्रत्येक सामना, प्रत्येक मालिका सर्वच संघांसाठी महत्त्वाची आहे.टीम इंडिया अव्वल आहे, याचा अर्थ जागतिक विजेता होत नाही. त्यासाठी भारताला ही स्पर्धा जिंकावी लागेल. २०१६ साली जेव्हा भारतीय संघ विंडीज दौ-यावर गेला होता, तेव्हा यजमान संघ कमजोर होता. मात्र आता तशी परिस्थिती नाही. गुणवान खेळाडूंच्या समावेशाने विंडीज संघ बळकट झाला आहे. ब्रायन लारा, रामनरेश सारवान या दिग्गजांचे त्यांना मार्गदर्शनही मिळत आहे. तसेच चांगले वेगवान गोलंदाजही विंडीजला मिळाले आहेत. त्यामुळे आता त्यांना नमवणे भारतासाठी सोपे नसेल.निवडीविषयी भारतापुढे काही अडचणी आहेत. कारण एका स्थानासाठी तीन ते चार खेळाडू सज्ज आहेत. उपकर्णधार अजिंक्य रहाणेचेही स्थान अजून निश्चित नाही. त्याच्यासमोर आव्हान उभे केले आहे ते रोहित शर्मा व हनुमा विहारी यांनी. हनुमा फारसे सामने खेळलेला नाही; पण जे सामने खेळला, त्यात त्याने छाप पाडली आहे. हे तिन्ही खेळाडू पाचव्या स्थानी खेळणारे आहेत. लोकेश राहुल-मयांक अग्रवाल हे सलामीला आल्यास पुजारा व कोहली अनुक्रमे तिसºया व चौथ्या क्रमांकावर खेळतील. सहाव्या स्थानी रिषभ पंत व त्यानंतर गोलंदाज खेळतील. त्यामुळे ६ फलंदाज खेळवावेत की ७, असा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे आहे.जागतिक कसोटी स्पर्धा असल्याने जिंकण्याचा प्रयत्न अधिक झाला पाहिजे. कारण न्यूझीलंड - श्रीलंका सामन्यात विजेत्या श्रीलंकेला ६० गुण मिळाले, तर दुसरा अ‍ॅशेस कसोटी सामना अनिर्णीत राहिल्याने आॅस्टेÑलिया - इंग्लंड यांना प्रत्येकी ८ गुण मिळाले. हा खूप मोठा फरक असल्याने प्रत्येक संघ विजयासाठीच खेळेल हे नक्की. त्यामुळे ५ गोलंदाजांसह खेळणे भारतासाठी योग्य ठरेल असे मला वाटते.

टॅग्स :बीसीसीआय