Join us  

महाराष्ट्राचा सौराष्ट्रवर दणदणीत विजय

राजकोट येथील रेल्वे क्रिकेट मैदानावर झालेल्या २३ वर्षांखालील झोनल लीग वन-डे क्रिकेट स्पर्धेत देविका वैद्य आणि तेजल हसबनीस यांनी झळकावलेल्या शानदार खेळीच्या बळावर महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर १७१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 2:42 AM

Open in App

औरंगाबाद : राजकोट येथील रेल्वे क्रिकेट मैदानावर झालेल्या २३ वर्षांखालील झोनल लीग वन-डे क्रिकेट स्पर्धेत देविका वैद्य आणि तेजल हसबनीस यांनी झळकावलेल्या शानदार खेळीच्या बळावर महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर १७१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह महाराष्ट्राला ४ गुण मिळाले.महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५0 षटकांत २ बाद २८७ धावा ठोकल्या. महाराष्ट्राकडून देविका वैद्य हिने ९८ चेंडूंतच १५ चौकारांसह १0८ धावांची स्फोटक खेळी केली. तेजल हसबनीस हिनेही चौफेर टोलेबाजी करताना १३0 चेंडूंत १३ चौकारांसह ११७ धावा केल्या. प्रियंका घोडकेने ४४ चेंडूंत २ चौकारांसह ३३ व मुक्ता मगरे हिने २ चौकारांसह १५ धावांचे योगदान दिले. देविका वैद्य हिने महाराष्ट्राला चांगली सुरुवात करून देताना प्रथम मुक्ता मगरे हिच्या साथीने ९.४ षटकांत ५१ धावांची सलामी दिली. त्यानंतर देविकाने तेजल हसबनीस हिला साथीला घेत दुसºया गड्यासाठी २५ षटकांत १६0 धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राच्या धावसंख्येचा मजबूत पाया रचला.देविका वैद्य बाद झाल्यानंतर तेजल हसबनीस हिने प्रियंका घोडके हिच्या साथीने तिसºया गड्यासाठी १४.४ षटकांत ७६ धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राला २८७ धावांची निर्णायक धावसंख्या उभारून दिली. सौराष्ट्र संघाकडून एम. तन्ना हिने ३३ धावांत २ गडी बाद केले.प्रत्युत्तरात सौराष्ट्रचा संघ ४१.३ षटकांत ११६ धावांत गारद झाला. सौराष्ट्रकडून रिद्धी रुपारेल हिने ३२ चेंडूंत ५ चौकारांसह २५, हिरा मोधावाडिया हिने १७ व तान्या राव हिने १९ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राकडून मुक्ता मगरे, देविका वैद्य आणि माया सोनवणे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. मुक्ता मगरे आणि देविका वैद्य यांच्या भेदक माºयापुढे सौराष्ट्र संघाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही.यासाठी त्यांनी अनुक्रमे १६, २१ आणि १२ धावा मोजल्या. तेजल हसबनीसने १३ धावांत १ गडी बाद केला.>संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : ५0 षटकांत २ बाद २८७.(तेजल हसबनीस नाबाद ११७, देविका वैद्य १0८, प्रियंका घोडके ३३, मुक्ता मगरे १५.) सौराष्ट्र : ४१.३ षटकांत सर्वबाद ११६. (रिद्धी रुपारेल २५, तान्या राव १९, हिरा मोधवाडिया १७. मुक्ता मगरे ३/१६, देविका वैद्य ३/२१, माया सोनवणे ३/१२, तेजल हसबनीस १/१३).

टॅग्स :क्रिकेटमहिला