Join us

सचिनने बाणावलीत लुटला जलसफरीचा आनंद

वॉटर स्कुटरवरून त्याने रपेट मारत जलसफरीचा आनंद लुटला अशी माहिती जलक्रीडा चालक पेले फेर्नांडिस यांनी दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 11:01 IST

Open in App

मडगाव:  महाराष्ट्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या चाहुलीच्या पार्श्वभूमीवरही अनेक पर्यटक गोव्याला पसंती देत असल्याचे स्पष्ट झालेले असतानाच क्रिकेटचा देव असे ज्याला संबोधले जाते तो सचिन तेंडुलकरही मागचे दोन दिवस गोव्यातच ठाण मांडून होता. शनिवारी त्याने बाणावली बिचवर जलसफरीचा आनंदही लुटला. शनिवारी सकाळी तो बाणावली समुद्र किनाऱ्यावर दिसला. वॉटर स्कुटरवरून त्याने रपेट मारत जलसफरीचा आनंद लुटला अशी माहिती जलक्रीडा चालक पेले फेर्नांडिस यांनी दिली.

सचिनचे गोव्यात वरचेवर येणेजाणे असते. मागचे दोन दिवस त्याचे वास्तव्य ताज हॉटेलमध्ये होते. गोव्याचा क्रेब मसाला विलक्षण आवडणाऱ्या सचिनने गुरुवारी केळशी येथील एका रेस्टॉरंटलाही भेट दिली होती. सध्या बरेच सेलेब्रिटी गोव्यात असून त्यात बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचाही समावेश आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याही सध्या गोव्यातच विश्रांती घेत आहेत

टॅग्स :सचिन तेंडुलकरगोवा