Join us  

रॉस टेलरच्या विक्रमी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने विंडीजपुढे ठेवले ४४४ धावांचे आव्हान

रॉस टेलरच्या विक्रमी १७ व्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दुस-या क्रिकेट कसोटी सामन्यात सोमवारी तिस-या दिवशी विंडीजपुढे ४४४ धावांचे आव्हान ठेवले आणि पाहुण्या संघाच्या दोन फलंदाजांना माघारी परतवत मालिकेत क्लीन स्वीपच्या दिशेने वाटचाल केली. तिस-या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची २ बाद ३० अशी स्थिती आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 6:46 AM

Open in App

हॅमिल्टन : रॉस टेलरच्या विक्रमी १७ व्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दुस-या क्रिकेट कसोटी सामन्यात सोमवारी तिस-या दिवशी विंडीजपुढे ४४४ धावांचे आव्हान ठेवले आणि पाहुण्या संघाच्या दोन फलंदाजांना माघारी परतवत मालिकेत क्लीन स्वीपच्या दिशेने वाटचाल केली. तिस-या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची २ बाद ३० अशी स्थिती आहे.आजचा दिवस न्यूझीलंडच्या नावावर राहिला. न्यूझीलंडने विंडीजचा पहिला डाव २२१ धावांत गुंडाळल्यानंतर १५२ धावांची आघाडी घेतली आणि त्यानंतर टेलरच्या नाबाद १०७ धावांच्या खेळीच्या जोरावर दुसरा डाव ८ बाद २९१ धावांवर घोषित करीत विंडीजपुढे ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले.न्यूझीलंडने त्यानंतर दुसºया डावात किरण पॉवेल (००) व शिमरोन हेटमायेर (१५) यांना तंबूचा मार्ग दाखवीत विंडीजला अडचणीत आणले. आजचा खेळ थांबला त्या वेळी सलामीवीर फलंदाज व कर्णधार क्रेग ब्रेथवेट (१३) व शाई होप (१) खेळपट्टीवर होते. विजयासाठी विंडीजला ४१४ धावा व न्यूझीलंडला ८ बळींची गरज आहे.न्यूझीलंडतर्फे कर्णधार केन विल्यम्सननेही ५४ धावांची खेळी केली. विंडीजतर्फे मिगुएल कमिन्सने ६९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर शेनन गॅब्रियल व रोस्टन चेस यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याआधी, सकाळच्या सत्रात ८ बाद २१५ धावसंख्येवरून पुढे खेळताना विंडीजने केवळ ६ धावांची भर घालत उर्वरित दोन विकेट गमावल्या.ट्रेंट बोल्टने (४-७३) व कमिन्स (१५) आणि गॅब्रियल (०) यांना क्लीन बोल्ड केले. टीम साऊदी, नील वेगनर व कोलिन डिग्रँडहोम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. (वृत्तसंस्था)- टेलरने शतकी खेळीदरम्यान न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक १७ शतके ठोकण्याचा दिवंगत माजी कर्णधार मार्टिन क्रो व विद्यमान कर्णधार केन विल्यम्सन यांच्या विक्रमाची बरोबरी साधली. टेलर या खेळीदरम्यान दोनदा सुदैवी ठरला. त्याने रेमन रिफरच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत १९८ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.

टॅग्स :क्रिकेटरॉस टेलर