Join us  

बंडखोर संघटना, टी१० क्रिकेट यांचे आयसीसीपुढे आव्हान

जागतिक क्रिकेटच्या भवितव्याविषयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) योजना कार्यकारी समूहाने (एसडब्ल्यूजी) सादर केलेल्या अहवालानुसार सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपुढे १८ प्रमुख आव्हाने आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 4:35 AM

Open in App

नवी दिल्ली : जागतिक क्रिकेटच्या भवितव्याविषयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) योजना कार्यकारी समूहाने (एसडब्ल्यूजी) सादर केलेल्या अहवालानुसार सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपुढे १८ प्रमुख आव्हाने आहेत. यामध्ये बंडखोर क्रिकेट संघटना, प्रस्तावित टी१० क्रिकेट आणि प्रसारकांच्या उत्सुकतेमध्ये होणारी घट हे तीन मुख्य घटक असल्याचे म्हटले गेले आहे. या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी एसडब्ल्यूजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळास (बीसीसीआय) नवी दिल्ली येथे बैठक घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.क्रिकेट आॅस्टेÑलियाचे डेव्हिड पीवर, बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी, सिंगापूरचे इम्रान ख्वाजा, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे पॅट्रिसिया करमबामी, विंडीज क्रिकेट बोर्डचे डेव कॅमरुन आणि महिला प्रतिनिधी क्लेरी कोनोर यांचा एसडब्ल्यूजी समूहामध्ये समावेश आहे. गुरुवारी होणाऱ्या बैठकीमध्ये या समूहाच्या वतीने बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना, कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी व खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांना जागतिक क्रिकेटसंबधीच्या योजनांची माहिती देण्यात येईल.बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, ‘हो, आयसीसीपुढे काही अडचणी आहेत. एक माजी क्रिकेट प्रशासकासह एक भारतीय टीव्ही वाहिनी आणि आॅस्टेÑलियन वकील यांनी मिळून समांतर जागतिक क्रिकेट संघटना स्थापन करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. यासाठी त्यांनी अनेक खेळाडू आणि अधिकाºयांशीही संपर्क केला आहे. या सर्वांनी या मोहिमेसाठी ‘आॅपरेशन वॉटरशेड’ असे नाव दिले होते.’ त्याचप्रमाणे, ‘प्रत्येक देशामध्ये समांतर क्रिकेट संघटना स्थापन करण्याचा या सर्वांचा प्रयत्न असून खेळाडूंना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वांना भरगच्च रक्कमेचे आमिषही दाखविण्यात आले आहे,’ असेही बीसीसीआय अधिकाºयाने म्हटले. (वृत्तसंस्था)>आयसीसीने आपल्या अहवालात कोणत्याही व्यक्तीचे किंवा संस्थेचे नाव स्पष्ट केलेले नाही. मात्र, २०१६ मध्ये आपल्या एका अहवालात आयसीसीने म्हटले होते की, पदावरून हकालपट्टी करण्यात आलेले माजी आयपीएल आयुक्त ललित मोदीने समांतर क्रिकेट संस्था स्थापन करण्यासाठी इंग्लंड आणि आॅस्टेÑलियाच्या अधिकाºयांसह संपर्क केला आहे. मात्र, त्यावेळी हे वृत्त केवळ अफवा म्हणून समोर आले होते.बीसीसीआय अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार आयसीसीपुढे टी१० क्रिकेटचेही आव्हान आहे. गेल्याच वर्षी एमिरेट्स क्रिकेट बोर्डने या लीगचे यशस्वी आयोजन केले होते, ज्यामध्ये इयॉन मॉर्गन, शोएब मलिक आणि ड्वेन ब्रावो यांसारखे दिग्गज खेळाडू खेळले होते. त्याचप्रमाणे वाढणारी फुटबॉल क्रेझही आयसीसीपुढे एक आव्हान असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.