Join us  

आरसीबी पंजाबच्या आव्हानासाठी सज्ज

रॉयल चॅलेंजर्सचे लक्ष्य इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज, सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ‘करा अथवा मरा’ लढतीत विजय मिळवित प्ले आॅफमध्ये स्थान मिळवण्याच्या धुसर आशा शिल्लक राखण्यावर केंद्रित झाले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 1:54 AM

Open in App

इंदूर : रॉयल चॅलेंजर्सचे लक्ष्य इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज, सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ‘करा अथवा मरा’ लढतीत विजय मिळवित प्ले आॅफमध्ये स्थान मिळवण्याच्या धुसर आशा शिल्लक राखण्यावर केंद्रित झाले आहे.आरसीबीला दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध पाच गडी राखून मिळवलेल्या विजयामळे काही अंशी दिलासा मिळाला आहे, तर सुरुवातीला चमकदार कामगिरी करणारा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ सातत्याने पराभव स्वीकारावा लागत असल्यामुळे संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे.राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतरही किंग्ज इलेव्हन पंजाब संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ गुणतालिकेत तळातून दुसºया स्थानी संघर्ष करीत आहे. आयपीएलमध्ये स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यामध्ये अनेक धक्कादायक निकाल नोंदविले गेले असून, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बँगलोर संघ पंजाबवर वर्चस्व गाजवण्यास प्रयत्नशील आहे. कोहली व एबी डिव्हिलियर्स यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर बँगलोरने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध सहज लक्ष्य गाठले. केकेआरच्या सुनील नारायण व दिनेश कार्तिक यांनी पंजाबच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना २४५ धावांची दमदार मजल मारली होती.उभय संघांची भिस्त फलंदाजीवर अवलंबून आहे. त्यात बँगलोर संघाची जबाबदारी कोहली व डिव्हिलियर्स यांच्यावर आहे, तर प्रीती झिंटाच्या संघाचा विश्वास लोकेश राहुल (५३७ धावा) आणि ख्रिस गेल (३३२ धावा) यांच्या फलंदाजीवर आहे.पंजाबतर्फे राहुलची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे, त्याने १६२ पेक्षा अधिक स्ट्राइकरेटने पाच अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सरासरी जवळजवळ ६० आहे. दरम्यान, उभय संघांना गोलंदाजांनी मात्र निराश केले आहे. (वृत्तसंस्था)कोहलीने ११ सामन्यांत ४६६ धावा फटकावल्या आहे. संघातर्फे तो सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज आहे. डिव्हिलियर्स त्याच्या तुलनेत १०८ धावांनी पिछाडीवर आहे. त्याने दोन सामने कमी खेळले आहेत. मन्दीप सिंग (११ सामने २४५ धावा) या यादीत तिसºया स्थानी आहे.