Join us  

केकेआरविरुद्ध आरसीबीला विजयाची आशा

मागच्या सामन्यात सपाटून मार खाणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज रविवारी विजयाच्या प्रतीक्षेत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 5:49 AM

Open in App

बेंगळुरु: मागच्या सामन्यात सपाटून मार खाणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज रविवारी विजयाच्या प्रतीक्षेत आहे.दोन विजय आणि चार पराभवामुळे आरसीबी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरला तर केकेआरने तीन विजय आणि चार पराभवानंतर चौथे स्थान गाठले.चेन्नईकडून झालेल्या पराभवांनतर आरसीबी चिन्नास्वामीवर केकेआर विरुद्ध कसा खेळेल, याकडे नजरा लागल्या आहेत. केकेआरला देखील काल दिल्लीकडून पराभवाचे तोंड पहावे लागले होते.उभय संघांदरम्यान झालेल्या मागील लढतीत नवा कर्णधार दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील केकेआरने सुनील नारायणच्या अर्धशकाच्या बळावर १७७ धावांचे लक्ष्य सहज गाठले होते. नारायण, कुलदीप यादव आणि पीयूष चावला यांनीही विजयात योगदान दिले.आरसीबीकडून एबी डिव्हिलियर्स फलंदाजीत अव्वल स्थानावर आहे. कर्णधार विराटनेही दोनदा अर्धशतकी खेळी केली पण विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. सलामीवीर क्विंटन डिकॉकने आतापर्यंत १६५ धावा केल्या आहेत, कोरी अ‍ॅण्डरसन आणि मनदीपसिंग यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)केकेआरला चिंता आहे ती गोलंदाजांची . काल दिल्लीविरुद्ध गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या. नंतर आंद्रे रसेलचा अपवाद वगळता सर्वच फलंदाज अपयशी ठरले. रॉबिन उथप्पा, ख्रिस लिन आणि दिनेश कार्तिक यांच्या खेळीमुळे संघ मोठ्या धावा उभारु शकतो. उथप्पाने १६४, लिन १९१, नीतीश राणा १७३ आणि कार्तिकने आतापर्यंत २१२ धावा उभारल्या आहेत.

टॅग्स :आयपीएल 2018रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स