Join us  

‘ए प्लस’ प्रस्ताव कोहली व धोनी यांनी दिलेला- विनोद राय

चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘ए प्लस’ दर्जाचा करार मिळावा, अशी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची इच्छा होती, असे प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांनी सांगितले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:36 AM

Open in App

नवी दिल्ली : चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘ए प्लस’ दर्जाचा करार मिळावा, अशी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची इच्छा होती, असे प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांनी सांगितले. धोनीला केंद्रीय कराराच्या एलिट गटातून वगळण्यात आले, असे मानल्या जात आहे.२६ क्रिकेटपटूंना केंद्रीय करार देण्यात आला. त्यात कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांचा ७ कोटी रुपये रकमेच्या ‘ए प्लस’ दर्जामध्ये समावेश करण्यात आला. धोनी ‘ए’ ग्रेडमध्ये आहे. त्याला वार्षिक पाच कोटी रुपये मिळतात.राय यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘ए प्लस दर्जाच्या कराराचा प्रस्ताव खेळाडूंनी दिला होता. आम्ही धोनी व विराट यांच्यासोबत या दर्जाबाबत चर्चा केली होती. त्यांनी सर्वोत्तम स्तरासाठी दर्जा असायला हवा, असा प्रस्ताव दिला होता. त्यात खेळाच्या तिन्ही प्रकारात खेळणाºया खेळाडूंचा समावेश करता येईल.’राय म्हणाले, ‘धोनी व कोहली हे दोघेही ‘ए प्लस’ या विशेष दर्जासाठी अनुकूल होते. त्यामुळे भारतीय संघात सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू कोण आहेत, याची माहिती होईल.या गटातील खेळाडू आत-बाहेर होऊ शकतात. त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करणाºया खेळाडूंना त्यांचे स्थान मिळत असल्याचे सिद्ध होईल.’ कोहली व धोनी यांच्यातील ताळमेळ बघून राय खूश आहेत. राय म्हणाले, ‘त्यांच्यातील ताळमेळ अद्वितीय आहे. दोघेही एकमेकांचा आदर करतात. धोनीच्या क्रिकेट ज्ञानाचा विराट आदर करतो तर विराटच्या कामगिरीबाबत धोनीला आदर आहे.’ (वृत्तसंस्था)>विराटने सीओएला सांगितले की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सध्यातरी धोनीचे स्थान कुणी घेऊ शकत नाही. राय म्हणाले,‘विराटच्या मते सध्या धोनीच्या तुलनेत दुसरा कुणी जलद यष्टिरक्षक नाही. त्याचसोबत धोनीचा प्रदीर्घ अनुभव विराटसाठी महत्त्वाचा आहे. धोनीमध्ये अद्याप किती क्रिकेट शिल्लक आहे, हे आगामी कालवधीत त्याच्या कामगिरीवरून स्पष्ट होईलच.’