रमण लांबा - 1998 साली एक क्लबस्तरीय सामना खेळणारा भारतीय फलंदाज रमन लांबा फॉरवर्ड शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षण करीत होता. फलंदाजाने मारलेला चेंडू त्याच्या डोक्यावर आदळून थेट यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. तीन दिवस मृत्यूशी झुंज देणा:या लांबाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला.
गॅरी कर्स्टन - पाकचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेच आपल्या बाऊन्सरवर द. आफ्रिकेचा फलंदाज गॅरी कर्स्टन याला जखमी केले. कर्स्टनच्या गालाला दुखापत झाली होती.
ब्रायन लारा - 2004 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान हा वेस्ट इंडिजचा आधारस्तंभडावखुरा दिग्गज फलंदाज पाकचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या बाऊन्सरवर रक्तबंबाळ झाला होता.
नरी कॉन्ट्रॅक्टर - भारतीय कर्णधार या नात्याने 1962 च्या वेस्ट इंडिज दौ:यात चार्ली ग्रिफिथ याचा बाऊन्सर नरी यांच्या डोक्यावर आदळला. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्यातून बरे होण्यास त्यांना दीर्घ काळ लागला. तो या दुखापतीतून तर सावरले पण नंतर कधीही खेळू शकले नाही.
रिकी पाँटिंग- 2005 च्या अॅशेस मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन याच्या उसळी घेणा:या चेंडूवर हूक मारण्याच्या नादात ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराने स्वत:चा गाल दुखापतग्रस्त करुन घेतला.
मार्क बाऊचर- : दक्षिण आफ्रिकेचा हा यष्टिरक्षक - फलंदाज लेग स्पिनर इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करतेवेळी स्वत:चा डोळा गमावून बसला. यानंतर बाऊचरचे करियर संपुष्टात आले.
स्टीव्ह वॉ - 1999 च्या गाले कसोटीत श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराचे नाक फुटले होते. कोलिन मिलरच्या चेंडूवर माहेला जयवर्धने याच्या बॅटला लागून चेंडू हवेत गेला. हा चेंडू टिपण्यासाठी शॉर्ट फाईन लेगवरुन स्टीव्ह वॉ आणि डीप फाईन लेगवरुन जेसन गिलेस्पी दोघेही धावल्याने परस्परांशी त्यांची टक्कर झाली. त्यामुळे वॉ च्या नाकाला गंभीर दुखापत झाली होती.
फिल ह्युज- ऑस्ट्रेलियाचा युवा क्रिकेटपटू फिलिप ह्यूज याला बाऊन्सर लागून झालेला मृत्यू या घटनेमुळेमुळे क्रिकेट विश्व हादरले. मैदानावर खेळाडूंना जखमा होणे ही नित्याचीच बाब असली तरीही पण मृत्यूमुखी पडणे ही तितकचे गंभीर व दु:खदायी बाब आहे! मैदानावर याआधी जे प्रसंग घडले त्यावर हा एक दृष्टीक्षेप.