Join us  

बुमराह संघात, पार्थिव पटेलचे पुनरागमन

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराहला दक्षिण आफ्रिका दौºयासाठी सोमवारी जाहीर झालेल्या कसोटी संघात पाचवा वेगवान गोलंदाज म्हणून भारताच्या १७ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 5:22 AM

Open in App

नवी दिल्ली : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराहला दक्षिण आफ्रिका दौºयासाठी सोमवारी जाहीर झालेल्या कसोटी संघात पाचवा वेगवान गोलंदाज म्हणून भारताच्या १७ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे, तर यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला आहे.कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेप्रमाणे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठीही विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या स्थानी रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल. वाशिंगटन सुंदर, बासिल थम्पी, जयदेव उनाडकट आणि दीपक हुड्डा यांचा १५ सदस्यांच्या संघात समावेश आहे.एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर निवड समितीने दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीचा अंदाज घेत वेगवान गोलंदाजी आक्रमण अधिक मजबूत केले आहे. संघात पाच वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त हार्दिक पांड्याचा समावेश आहे. त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती.कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात फलंदाजी व फिरकी विभागात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. पण रिद्धिमान साहा याच्यासह पार्थिव पटेलची दुसरा यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. पार्थिवने वर्षभरानंतर संघात पुनरागमन केले आहे. त्याने अखेरचा कसोटी सामना डिसेंबर २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध चेन्नईमध्ये खेळला होता.भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामने खेळणार आहे. पहिली लढत ५ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळल्या जाणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित सदस्य असलेल्या बुमराहला प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. बुमराहने आतापर्यंत २८ वन-डेमध्ये ५२ बळी घेतले असून, ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ४० विकेट घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २६ सामन्यांत ८९ बळींची नोंद आहे. (वृत्तसंस्था)दक्षिण आफ्रिका दौºयासाठी कसोटी संघविराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह.श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी संघरोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, वाशिंगटन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हुड्डा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी, जयदेव उनाडकट.

टॅग्स :रोहित शर्माक्रिकेटक्रीडा