Join us  

पांड्या उत्कृष्ट अष्टपैलू बनू शकतो, मर्यादित षटकांमध्ये तो उल्लेखनीय

हार्दिक पांड्या भारतीय संघाचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बनू शकतो, असा विश्वास द. आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुझनर याने व्यक्त केला. पांड्याने पहिल्या कसोटीत ९५ चेंडूत ९३ धावा ठोकल्या शिवाय दुसºया डावात २७ धावांत दोन गडी बाद केले होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 7:30 AM

Open in App

केपटाऊन : हार्दिक पांड्या भारतीय संघाचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बनू शकतो, असा विश्वास द. आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुझनर याने व्यक्त केला. पांड्याने पहिल्या कसोटीत ९५ चेंडूत ९३ धावा ठोकल्या शिवाय दुसºया डावात २७ धावांत दोन गडी बाद केले होते.वृत्तसंस्थेशी बोलताना क्लुझनर म्हणाला,‘भारताच्या पहिल्या डावात पांड्याची फलंदाजी चांगली होती. संघाला संकटाबाहेर काढून त्याने यजमानांवर दडपण आणले. सध्या तो शिकत आहे. गोलंदाजीत वेग आणल्यास देशासाठी तो अमूल्य खेळाडू बनू शकतो. पांड्या आपल्या लहानशा करियरमध्ये खºया अर्थाने अष्टपैलू ठरला. मर्यादित षटकांच्या सामन्यात फलंदाजी-गोलंदाजीत त्याचा रेकॉर्ड उल्लेखनीय आहे.’हार्दिकला करियरमध्ये अनेकदा अपयशाचा सामना करावा लागू शकतो. पण त्याने संयम ढळू देऊ नये. त्याचे कौतुक करण्याची गरज आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाºया पांड्याला योग्य सल्ला देण्याची गरज असल्याचे मत क्लुझनरने व्यक्त केले. भारताने सध्याच्या दौºयात एकही सराव सामना खेळला नाही. क्लुझनरने दौºयात सराव सामन्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सराव सामना खेळणे नेहमी चांगले असते. भारतीय संघ आशिया खंडात खेळत असेल तर सराव सामना खेळला नाही तरीफरक पडत नाही. पण द. आफ्रिकेत सराव सामन्याद्वारे हवामानाशी एकरूप होता येते. भारताला किमान एक सराव सामना हवा होता. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवापासून भारताने बोध घ्यावा, असेही क्लुझनरचे मत होते. (वृत्तसंस्था)धडा शिकावा...भारत पहिल्या पराभवापासून धडा घेऊ शकतो. पुढील सामन्यात अधिक भक्कमपणे वेगवान माºयाचा सामना करायला हवा. द. आफ्रिकेत वेगवान मारा खेळून काढण्यास सज्ज राहायला हवे. भारतीय फलंदाजांसाठी चार वेगवान गोलंदाजांना तोंड देणे जड गेले. लहानसे लक्ष्य गाठताना पराभूत होणे हे निराशादायी असते. आफ्रिकेच्या वेगवान माºयाच्या तुलनेत भारताकडे वेगवान गोलंदाजांची उणीव जाणवली.भारतीय वेगवान गोलंदाजांना उसळी घेणारे चेंडू पाहून धडकी भरायची, पण यंदा त्यांनी फूललेंग्थ चेंडू टाकले. डावपेंचांचाही योग्य वापर केला, असे क्लुझनरचे मत होते.

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रिकेट