Join us  

पाकिस्तानचा शानदार मालिका विजय, विश्व एकादशचा पराभव, अहमद, बाबर यांची निर्णायक फटकेबाजी

अहमद शेहझाद (८९) आणि बाबर आझम (४८) यांच्या तडाखेबंद फलंदाजीनंतर केलेल्या नियंत्रित गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने विश्व एकादशला ३३ धावांंनी नमवले. यासह पाकने तीन टी२० सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:57 AM

Open in App

लाहोर : अहमद शेहझाद (८९) आणि बाबर आझम (४८) यांच्या तडाखेबंद फलंदाजीनंतर केलेल्या नियंत्रित गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने विश्व एकादशला ३३ धावांंनी नमवले. यासह पाकने तीन टी२० सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना पाकने ४ बाद १८३ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना विश्व एकादशला ८ बाद १५० धावाच करता आल्या.गद्दफी स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना विश्व एकादश संघ अडखळताना दिसला. तमिम इक्बालने (१४) संघाला वेगवान सुरुवात करुन दिली. तो अतिआक्रमणाच्या नादात बाद झाला. हाशिम आमला १२ चेंडूत ४ चौकारांसह २१ धावा काढून परतला. बेन कटिंग (५), कर्णधार फाफ डू प्लेसिस (१३), जॉर्ज बेली (३) अपयशी ठरले. यानंतर डेव्हिड मिल्लर (३२), थिसारा परेरा (३२) व डॅरेन सॅमी (नाबाद २४) यांनी संघाच्या आशा कायम ठेवत चांगली फटकेबाजी केली. परंतु, दडपणाखाली त्यांना मनसोक्त फटकेबाजी करण्यात यश आले नाही. हसन अलीने २, तर इमाद वासिम, उस्मान खान व रुमान रईस यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.तत्पूर्वी, फखर झमन (२७) व अहमद यांनी पाकला ६१ धावांची सलामी दिली. सॅमीने फखरला धावबाद करुन ही जोडी फोडली. मात्र यानंतर अहमद व बाबर यांनी चौफेर फटकेबाजी केली. अहमदने ५५ चेंडूत ८९ धावा काढत ८ चौकार व ३ षटकार खेचले. बाबरने ३१ चेंडूत ५ चौकारांसह ४८ धावा काढल्या. दोघांनी १०२ धावांची आक्रमक भागीदारी केली. दोघे बाद झाल्यानंतर शोएब मलिकने ७ चेंडूत २ षटकारांसह नाबाद १७ धावा काढल्या. थिसारा परेराने २ बळी घेत चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकपाकिस्तान : २० षटकात ४ बाद १८३ धावा (अहमद शेहझाद ८९, बाबर आझम ४८; थिसारा परेरा २/३७) वि.वि. विश्व एकादश : २० षटकात ८ बाद १५० धावा (थिसारा परेरा ३२, डेव्हिड मिल्लर ३२, डॅरेंन सॅमी नाबाद २४; हसन अली २/२८)

टॅग्स :क्रिकेटपाकिस्तान