Join us  

एकदिवसीय मालिकाही कसोटी मालिकेप्रमाणेच एकतर्फी होईल

ज्या प्रकारे पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने सहजपणे विजय नोंदवला, ते पाहता एकदिवसीय मालिकाही कसोटी मालिकेप्रमाणेच एकतर्फी होईल, असे दिसते. परंतु, हे दिसते तेवढे सहजपणे होणार नसल्याची भारतीयांना जाणीव आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 2:03 AM

Open in App

- सुनील गावसकर लिहितात...ज्या प्रकारे पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने सहजपणे विजय नोंदवला, ते पाहता एकदिवसीय मालिकाही कसोटी मालिकेप्रमाणेच एकतर्फी होईल, असे दिसते. परंतु, हे दिसते तेवढे सहजपणे होणार नसल्याची भारतीयांना जाणीव आहे. श्रीलंकेने पहिल्या सामन्यात जबरदस्त सुरुवात करताना ३० षटकांपर्यंत ३ बाद १६० अशी मजल मारली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये म्हटले जाते की, प्रथम फलंदाजी करणारा संघ ३० षटकांपर्यंत जेवढ्या धावा करतो, तितक्याच धावा उर्वरित षटकांमध्येही उभारतो, फक्त आवश्यक बळी शिल्लक राहिले पाहिजेत. पण याच क्षणापासून भारतीयांनी ठराविक अंतराने बळी घेताना श्रीलंकेला मोठी भागीदारी करण्यापासून रोखले. यामुळे यजमानांचा डाव २१६ धावांवर संपुष्टात आला. अक्षर पटेलचा भेदक मारा आणि त्याचबरोबर लंकेच्या फलंदाजांकडून झालेल्या कमजोर फलंदाजीमुळे ही घसरगुंडी उडाली. स्ट्राइक बदलत राहणं ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत महत्त्वाची बाब आहे आणि भारतीयांनी या गोष्टीपासूनच यजमानांना दूर ठेवत त्यांच्यावर दबाव आणला. भारताचे ३० मीटर क्षेत्रातील क्षेत्ररक्षण कोणत्याही संघाच्या तुलनेत चांगले असून, त्यांनी सहजासहजी लंकेला एकेरी धाव काढून दिल्या नाहीत.पूर्वीपासून लंकेत येण्याची संधी मिळाली असून, एक गोष्ट नक्की, की येथील खाद्यपदार्थ खूप अप्रतिम आहे. पण, असे असले तरी भारतीय खेळाडू हे खाद्य खूप मर्यादितपणे खातात. त्याउलट हेच पथ्य काही श्रीलंकन खेळाडूंकडून झाले नाही आणि याचा परिणामही पाहायला मिळाला. त्यामुळेच, त्यांना एकेरी धावा घेण्यात अडचण आली आणि परिणामी स्ट्राइकमध्ये बदलही झाला नाही. त्यामुळेच त्यांना मोठे फटके खेळून धोका पत्करावा लागला.दुसरी गोष्ट म्हणजे, भारताचे क्षेत्ररक्षण शानदार झाले आणि काही फेकी या थेट यष्ट्यांवर झाल्या. यामध्ये रोहित शर्माने केलेली फेक अप्रतिम होती. चांगले क्षेत्ररक्षण नेहमीच गोलंदाजीची धार आणखी वाढवते आणि लंकेच्या गोलंदाजांना या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. त्याचबरोबर लंकेच्या गोलंदाजांना फलंदाजांकडूनही मोठ्या आशा असून, मोठ्या धावांंचे रक्षण करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा गोलंदाजांची आहे. भारताच्या अशा मजबूत फलंदाजीपुढे ३०० हून कमी धावांचे संरक्षण करणे कधीच सोपे नसते. त्यामुळे लंकन गोलंदाजांना फलंदाजांकडून शतकी खेळींची अपेक्षा आहे, जी धवन आणि कोहली यांनी भारतासाठी केली.केवळ मजबूत भागीदारीच्या जोरावर संघ चांगली धावसंख्या उभारू शकतो. त्यामुळेच लंकन फलंदाजांची जबाबदारी अधिक वाढली आहे. नाहीतर, जरी ते पार्टी करण्यासाठीआले तरी संगीत मात्र भारतीयचवाजेल. (पीएमजी)

टॅग्स :क्रिकेट