Join us  

एकदिवसीय सामन्यांचे निकाल अतिशय निराशाजनक

भारताचा हा न्यूझीलंड विरोधातील एकदिवसीय सामन्यातील हा तिसरा पराभव होता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 4:27 AM

Open in App

भारताने टी-२० मालिका जिंकल्यावर एकदिवसीय मालिकेतदेखील विजयाची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांचे निकाल निराशाजनक आहेत. विराट कोहली आणि त्याच्या संघाने दोन्ही सामन्यांत संधी गमावली. तिसऱ्या सामन्याच्या निकालाचा काहीही परिणाम मालिकेवर होणार नाही. किवी संघाने मालिका जिंकली आहे.

शनिवारी झालेल्या सामन्यात भारताची प्रतिष्ठा श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि नवदीप सैनी यांच्यामुळे वाचली. यांनी कठीण परिस्थितीतदेखील पराभूत मानसिकता न ठेवता भारताला विजय मिळवून देण्याच्या उद्देशाने खेळ केला.भारताचे माफक लक्ष्य होते. या खेळपट्टीवर २७४ धावांचा पाठलाग करणे फारसे कठीण नव्हते. मात्र, आघाडीच्या फलंदाजांना फार धावा करता आल्या नाही. एका टप्प्यावर असे वाटत होते की, कदाचित भारत २०० धावादेखील करू शकणार नाही. मात्र अय्यर, जडेजा आणि सैनी यांनी शानदार खेळ केला.

विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यापासून भारताचा हा न्यूझीलंड विरोधातील एकदिवसीय सामन्यातील हा तिसरा पराभव होता.

भारताचे काय चुकले?रोहित शर्माची अनुपस्थिती हा मुद्दा आहेच. शिखर धवनदेखील संघात नाही. कोहलीला त्याचा सर्वोत्कृष्ट खेळ दाखवता आला नाही. त्यामुळे इतर फलंदाजांवर मोठी जबाबदारी होती. त्यात अय्यर आणि के. एल. राहुल यांचा फॉर्म सध्या अप्रतिम आहे. मात्र, चौथ्या स्थानानंतर समस्या आहेत. राहुल हा संघ व्यवस्थापनासमोर पाचव्या स्थानासाठी चांगला पर्याय आहे. मात्र, त्याला या फॉर्ममध्ये शक्य तितकी अधिक षटके खेळण्याची गरज आहे.प्रश्न फक्त फलंदाजीच्या क्रमाचा नाही. अग्रवाल आणि पृथ्वी शॉ देखील गुणवान आहेत. मात्र, राष्ट्रीय संघात राहण्यासाठी त्यांनी संघाला चांगली सुरुवात करून देणे गरजेचे आहे. केदार जाधव दोन्ही सामन्यांत संघात सहावा गोलंदाज म्हणून राहू शकला असता. मात्र, त्याला संधीच मिळाली नाही. जर जाधव गोलंदाजी करत नसेल तर मनीष पांडेसारख्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाला घ्यायला हवे. मालिकेत काही गोलंदाजांनी जास्त धावा मोजल्या. बुमराहला एकही गडी बाद करता आला नाही. यावर्षी एकदिवसीय क्रिकेटची मोठी स्पर्धा नाही. मात्र, आॅक्टोबरमध्ये टी-२० चॅम्पियनशिप आणि कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलिस्टचा निर्णय होणार आहे.एका स्वरूपातील प्रतिकूल निकालाचा परिणाम क्रिकेटच्या दुसºया स्वरूपात होऊ शकतो.दोन कसोटी सामन्यांची मालिका लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे टी-२०तील विजयानंतर भारताला मिळालेला मानसिक फायदा या पराभवाने होणार नाही.- अयाझ मेमन कन्सल्टिंग एडिटर लोकमत