Join us  

न्यूझीलंडने केली पराभवाची परतफेड; कॉलिन मुन्रोचे तुफानी शतक, भारताचा ४० धावांनी पराभव

पहिल्या टी २० मधील पराभवाचे उट्टे काढताना न्यूझीलंडने दुस-या सामन्यात भारतावर ४० धावांनी विजय मिळवला. कॉलिन मुन्रोच्या तुफानी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दिलेल्या १९७ धावांचे लक्ष्यासमोर भारताची फलंदाजी ढेपाळली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 5:29 AM

Open in App

राजकोट : पहिल्या टी २० मधील पराभवाचे उट्टे काढताना न्यूझीलंडने दुस-या सामन्यात भारतावर ४० धावांनी विजय मिळवला. कॉलिन मुन्रोच्या तुफानी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दिलेल्या १९७ धावांचे लक्ष्यासमोर भारताची फलंदाजी ढेपाळली. विराट कोहलीचे अर्धशतक आणि महेंद्रसिंह धोनी (४९) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली. भारताचा संघ २० षटकांत ७ बाद १५६ धावाच जमवू शकला.पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दुसºया सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केले आहे. त्यामुळे मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे.न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुन्रोने आपल्या तुफानी खेळीने न्यूझीलंडला १९६ ही धावसंख्या उभारून दिली. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवातच खराब झाली. दुसºयाच षटकांत दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. त्या वेळी धावफलकावर फक्त ११ धावाच होत्या. रोहित शर्माला पाच धावांवर बोल्टने बाद केले. तर शिखरलाही बोल्टनेच तंबूत परत पाठवले. तिसºया क्रमांकावर आलेल्या अय्यर याने २१ चेंडूत २३ धावा केल्या. मात्र मुन्रोने त्याला झेलबाद केले. दहाव्या षटकांत ईश सोढीने हार्दिक पांड्याला बाद केले. त्यानंतर महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली या अनुभवी जोडीने भारताच्या आशा वाढवल्या. मात्र १७ व्या षटकांत मिशेल सेंटनर याने कोहलीला ग्लेन फिलीप्सकडे झेल देण्यास भाग पाडले. कोहलीने ४२ चेंडूत एक षटकार आणि ८ चौकारांच्या साहाय्याने ६५ धावा केल्या. तर महेंद्रसिंह धोनी याने ४९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या बोल्टने चार षटकांत ३४ धावा देत चार गडी बाद केले. तत्पूर्वी सामना खरा गाजवला तो कॉलिन मुन्रो याने. त्याने गुप्तीलच्या साथीने संघाला तुफानी सुरुवात करून दिली. गुप्तील याने ४१ चेंडूत ४५ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. या सामन्यात भारताकडून पर्दापण करणाºया जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजचे स्वागत दोन्ही फलंदाजांनी दमदार फटकेबाजी करून केले. सिराज ने या सामन्यात ४ षटकांत तब्बल ५३ धावा दिल्या. सिराजच्या दुसºया षटकांत मुन्रोने लॉंग आॅन आणि मिडवकेटवर षटकार ठोकले. तर गुप्तीलने चहलला मिडविकेटवर षटकार ठोकला. तर भुवनेश्वरच्या चेंडूवर मुन्रो सीमा रेषेवर झेलबाद होता होता वाचला.मुन्रोने ७ चौकार आणि ७ षटकांराच्या मदतीने ५८ चेंडूतच १०९ धावा केल्या. तर बुमराहने ४ षटकांत २३ धावा दिल्या. मालिकेतील अखेरचा सामना ७ नोव्हेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. (वृत्तसंस्था)धावफलकन्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल झे.पांड्या गो. चहल ४५, मुन्रो नाबाद १०९, केन विल्यम्सन झे. शर्मा गो. सिराज १२, टॉम ब्रुस नाबाद १८, अतिरिक्त १२. एकूण २० षटकांत २/१९६. गोलंदाजी - भुवनेश्वर कुमार - ४-०-२९-०, मोहम्मद सिराज - ४-०-५३-१, जसप्रीत बुमराह-४-०-२३-०, युझवेंद्र चहल ४-०-३६-१, अक्षर पटेल ३-०-३९-०, हार्दिक पांड्या १-०-१४-०.भारत : रोहित शर्मा झे. फिलीप्स गो. बोल्ट ५, शिखर धवन गो. बोल्ट १, श्रेयस अय्यर झे. गो. मुन्रो २३,विराट कोहली झे.फिलीप्स गो. सेंटनर ६५, हार्दिक पांड्या गो.सोढी १, महेंद्र सिंह धोनी झे. सेंटनर, गो.बोल्ट ४९, अक्षर पटेल झे. विल्यम्सन गो. बोल्ट५, भुवनेश्वर कुमार नाबाद २, जसप्रीत बुमराह १ अतिरिक्त ४, एकुण २० षटकांत ७ बाद १५६. गोलंदाजी - अ‍ॅडम मिल्ने ४-०-३०-०, ट्रेंट बोल्ट ४-०-३४-४, कॉलीन डी ग्रॅण्ड होम १-०-१०-०, मिशेल सेंटनेर ४-०-३१-१, ईश सोढी ४-०-२५-१, कॉलिन मुन्रो ३-०-२३-१

टॅग्स :क्रिकेट