Join us  

न्यूझीलंडला कामगिरी सुधारण्याची अपेक्षा, दुसरा सराव सामना आज

भारताविरुद्ध वन-डे मालिकेला रविवारपासून (दि. २२) सामोरे जाणाºया न्यूझीलंडला आज गुरुवारी खेळल्या जाणाºया दुसºया सराव सामन्यात बोर्ड एकादशविरुद्ध उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:58 AM

Open in App

मुंबई : भारताविरुद्ध वन-डे मालिकेला रविवारपासून (दि. २२) सामोरे जाणा-या न्यूझीलंडला आज गुरुवारी खेळल्या जाणा-या दुस-या सराव सामन्यात बोर्ड एकादशविरुद्ध उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.बोर्ड एकादशच्या युवा संघात पृथ्वी शॉ, लोकेश राहुल आणि करुण नायर यांचा समावेश असून, या त्रिकुटाच्या कामगिरीमुळे केन विल्यम्सनच्या संघावर काल पहिल्या सराव सामन्यात ३० धावांनी विजय नोंदविला होता.कालच्या लढतीदरम्यान शहाबाज नदीम, तसेच कर्ण शर्मा यांच्यापुढे घसरगुंडी झाल्यानंतर आजच्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांना कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंचा सामना करावा लागेल.यजमान संघाकडून १७ वर्षांचा पृथ्वी शॉ याच्या कामगिरीकडे पुन्हा एकदा लक्ष लागले आहे. ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी आणि अ‍ॅडम मिल्नेया गोलंदाजांचा त्याने यशस्वीपणे सामना केला होता. निवडकर्त्यांचे त्याच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. (वृत्तसंस्था)न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेतून वगळण्यात आलेल्या लोकेश राहुलला रणजी सामन्यासाठी फॉर्ममध्ये परतण्याची संधी सराव सामन्याद्वारे आली आहे.न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि सहका-यांनी भारतीय फिरकीचा यशस्वीपणे सामना केल्यास सराव सामना जिंकणे कठीणजाणार नाही. पण त्यासाठी रॉस टेलर आणि कॉलिन मुन्रो यांच्याकडूनही धावा अपेक्षित आहेत. काल दोघेही चुकीचा फटका मारून बाद झाले होते. 

टॅग्स :क्रिकेटन्यूझीलंड