वांगारेई (न्यूझीलंड) : न्यूझीलंडने येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रेसवेलने सुमारे वर्षभरानंतर पुनरागमन करीत भेदक गोलंदाजी केली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात गेल (२२ ), तर शाई होप (०) यांना बाद केले. त्याने ५५ धावा देत ४ गडी बाद केले. वेस्ट इंडीजने निर्धारित ५० षटकांत २४८ धावा केल्या. एविन लुईस याने सर्वाधिक ७६ धावा केल्या. उत्तरादाखल मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने चार षटके शिल्लक असतानाच विजय संपादन केला. जॉर्च वर्कर (५७) व कॉलिन मुन्रो (४९) यांनी पहिल्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. रॉस टेलरने नाबाद ४९ धावा केल्या. दुसरा एकदिवसीय सामना शनिवारी होणार आहे.