Join us  

विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर कुलदीपला संधी देण्याची गरज

टीम इंडियाची फलंदाजी उत्कृष्ट आहे. संघ व्यवस्थापनाने सीनियर गोलंदाजांना विश्रांती दिल्यामुळे गोलंदाजीकडे मात्र लक्ष देण्याची गरज आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 3:14 AM

Open in App

- के. श्रीकांत लिहितात...टीम इंडियाची फलंदाजी उत्कृष्ट आहे. संघ व्यवस्थापनाने सीनियर गोलंदाजांना विश्रांती दिल्यामुळे गोलंदाजीकडे मात्र लक्ष देण्याची गरज आहे. विश्वचषक डोळ्यापुढे असल्यामुळे सर्व योजना त्यादृष्टीने आखल्या जात आहेत, यात शंका नाही. विश्वचषकाच्या मोहिमेत मनगटाला वळण देणारे फिरकीपटू मोलाची भूमिका बाजवत आहेत. अशावेळी कुलदीप यादवला संघात स्थान देण्याची हीच वेळ असेल. आॅस्ट्रेलियातील मोठी मैदाने आणि चेंडूतील उसळी पाहता कुलदीप-चहल यांची जोडी भेदक ठरू शकेल. सध्याच्या मालिकेत कुलदीपला संधी मिळणे गरजेचे असेल. राहुल चाहर हा देखील चांगला पर्याय असेल; पण कुलदीपचा अनुभव ही त्याच्या जमेची बाजू आहे.विश्वचषकासाठी माझ्या संघात एक आॅफ स्पिनरचा देखील समावेश असेल. वॉशिग्टंन सुंदर हा धावा रोखणारी गोलंदाजी करतोच, शिवाय फलंदाजीतही प्रभावित करतो. त्याचे क्षेत्ररक्षणही शानदार आहे. रोहितने वॉश्ािंग्टन सुंदरचा वापर प्रभावीपणे केला. त्याने सुंदरकडून दोन षटके पॉवर प्लेमध्ये, तर दोन षटके धावा रोखण्यासाठी मधल्या षटकांत दिली. फिरकीपटूंचा प्रभावीपणे वापर केल्यामुळेच भारताला नियमितपणे बळी मिळत गेले. तीन फिरकीपटूंबद्दल बोलल्यानंतर हार्दिक पांड्यासारखा अष्टपैलू खेळाडू संघात असेल, तर वेगवान माऱ्याबद्दल बोलायलाच हवे. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांना संघात स्थान मिळेलच; पण त्यांना सहकार्य करणारा तिसरा वेगवान गोलंदाज कोण, हा चिंतेचा विषय आहे.खलील अहमद हा पर्याय ठरू शकत नाही. त्याला सुधारणेस वाव आहे; पण वेगाने सुधारणा होणे गरजेचे असेल. दीपक चाहरमध्ये ‘दम’ दिसतो. पण, आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेत त्याच्यापुढे समस्यांचा डोंगर उभा राहू शकतो. वेगवान म्हणून त्याच्या भात्यात वेगळी शस्त्रे असतील तरच तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून पर्याय ठरू शकेल. भारत-बांगलादेश यांच्यात आज, रविवारी होणाºया तिसºया आणि निर्णायक सामन्यात यजमान संघ दावेदार या नात्याने मैदानात पाय ठेवणार, हे नक्की. (टीसीएम)