Join us  

मुंबई लीग ‘आयपीएल’साठी पहिले पाऊल ठरेल - विनोद कांबळी

‘टी२० मुंबई लीग ही स्पर्धा मुंबईकर युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी असेल. माझ्या मते ‘आयपीएल’साठी युवा खेळाडूंकरिता ही स्पर्धा पहिले पाऊल असेल,’ असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 1:49 AM

Open in App

मुंबई : ‘टी२० मुंबई लीग ही स्पर्धा मुंबईकर युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी असेल. माझ्या मते ‘आयपीएल’साठी युवा खेळाडूंकरिता ही स्पर्धा पहिले पाऊल असेल,’ असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने व्यक्त केले.गुरुवारी मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) बहुचर्चित ‘टी२० मुंबई लीग’ क्रिकेट स्पर्धेची घोषणा केली. तसेच स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अभिनेता सैफ अली खान याच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी कांबळीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.कांबळीने म्हटले, ‘मी एकदिवसीय व कसोटी क्रिकेट या दोन्ही प्रकारांत मनसोक्त फटकेबाजी केली असल्याने आमच्यावेळी अशी स्पर्धा नसल्याची खंत अजिबात नाही.’ त्याचप्रमाणे, ‘या टी२० लीगमध्ये कोणत्या संघाने प्रशिक्षकपदासाठी माझ्याकडे विचारणा केल्यास मी नक्कीच त्यासाठी तयार होईन,’ असेही कांबळी म्हणाला.भारताच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौºयाबाबत कांबळीने म्हटले की, ‘टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तिथले वातावरण वेगवान गोलंदाजीसाठी पूरक असून आपला संघ मजबूत फलंदाजीच्या जोरावर चांगली कामगिरी करेल असा विश्वास आहे.’ कांबळीने कोहलीचे कौतुक करताना सांगितले की, ‘कोहलीचा फॉर्म जबरदस्त आहे. मीदेखील खूप वर्षांआधी सलग दोन द्विशतके झळकावली होती. कोहलीने या कामगिरीची पुनरावृत्ती केल्याचा आनंद आहे.’४ ते ९ जानेवारी २०१८ दरम्यान रंगणाºया पहिल्या टी२० मुंबई लीग स्पर्धेत उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर, मध्य उत्तर, दक्षिण आणि मध्य दक्षिण अशा सहा विभागांतील प्रत्येकी एका संघाचा समावेश असेल. तसेच या लीगसाठी मुंबई विभागातील चमकदार खेळाडूंसह आयपीएलमध्ये छाप पाडलेल्या मुंबईकर खेळाडूंची यादी ‘एमसीए’ तयार करणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने राउंड रॉबिन पद्धतीने वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार असून प्रत्येक दिवशी ३ सामने होणार असल्याची माहिती ‘एमसीए’कडून मिळाली.

Open in App