Join us  

MS Dhoni: MS धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार?, चेन्नईत खेळला शेवटचा सामना; जाणून घ्या हे ३ संकेत

MS Dhoni: सीएसकेचा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर असो की मग मुंबईतील वानखेडेवर... सर्वत्र धोनी... धोनीचे नारे पाहायला मिळत आहेत.

By मुकेश चव्हाण | Published: May 15, 2023 1:59 PM

Open in App

आयपीएलचा सोळावा हंगाम मैदानात आणि मैदानाबाहेर महेंद्रसिंग धोनीमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आयपीएलला रामराम करणार का? याकडे सर्व क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे. धोनीने मात्र अनेकदा वेगवेगळी विधानं करून सस्पेन्स कायम ठेवला आहे. धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून धोनी केवळ आयपीएलमध्ये खेळत आहे. धोनीचा यंदाचा हंगाम अखेरचा असल्याचा सूर असल्यामुळे चाहते त्याची झलक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहे. 

सीएसकेचा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर असो की मग मुंबईतील वानखेडेवर... सर्वत्र धोनी... धोनीचे नारे पाहायला मिळत आहेत. अनेक क्रिकेट जाणकारांनी धोनीचा हा शेवटचा हंगाम असल्याचे म्हटले आहे.चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यानंतर धोनी बोलायला आला तेव्हा मैदानात उपस्थित असणाऱ्या चाहत्यांचा इतका आवाज होता की त्याला माईकचा आवाज वाढवावा लागला. शेवटी धोनीने संपूर्ण स्टेडियममध्ये फिरून प्रेक्षकांचे आभार मानले.

यंदाची आयपीएल धोनीची शेवटची असणार की पुढच्या वर्षी देखील तो आयपीएल खेळणार?, हे पुढील तीन संकेतावरुन आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. 

१. आयपीएल २०२३मध्ये एमएस धोनी जिथे जिथे सामने खेळायला गेला तिथे मोठ्या संख्येने प्रेक्षक आले. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरील सामन्यानंतर त्याने स्वत: सांगितले की, चाहते त्याला फेअरवेल देण्यासाठी आले होते. खुद्द माहीने पुढच्या सीझनमध्ये उतरण्याबाबत काहीही सांगितलेले नाही. अचानक मोठे निर्णय घेण्यासाठी त्यांची ओळख आहे. २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर त्याने २०२० मध्ये अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

२. इंडियन प्रीमियर लीगने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एमएस धोनीचा व्हिडिओ शेअर केला आहे. असे प्रसंग कमी पाहिले गेले आहेत, तर एखादा खेळाडू संपूर्ण मैदानात फिरतो आणि निवृत्तीपूर्वी प्रेक्षकांना भेटतो. या व्हिडिओवर टिप्पणी करताना एकाने लिहिले की धोनीने शेवटचा सामना चेपॉकमध्ये खेळला. अशाच अनेक कमेंट्सही आल्या आहेत.

३. सुरेश रैनापासून ते रॉबिन उथप्पापर्यंत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेल्या अनेक दिग्गजांनी महेंद्रसिंग धोनी आयपीएलचे आणखी एक किंवा दोन हंगाम खेळू शकतो, असे म्हटले आहे. पण ज्या पद्धतीने सुनील गावस्कर मैदानात उतरले आणि धोनीला मिठी मारली, त्याने माहीच्या निवृत्तीच्या चर्चेला आणखी हवा दिली. आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली असती तर तो फक्त चेन्नई सुपर किंग्जसोबतच खेळला असता, जेणेकरून धोनीसारख्या मोठ्या कर्णधाराला त्याला समजून घेण्याची संधी मिळाली असती, असे गावसकर यांनी यापूर्वी म्हटले होते. धोनीसारखे खेळाडू १०० वर्षांतून एकदा येतात, असंही गावसकर यांनी सांगितले.

टॅग्स :एम. एस. धोनीचेन्नई सुपर किंग्ससोशल व्हायरल
Open in App