Join us  

सरावाची शेवटची संधी; बांगलादेशविरुद्ध लढत आज

भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेपूर्वी मंगळवारी येथे बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या व अखेरच्या सराव सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 4:05 AM

Open in App

कार्डिफ : फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या फरकाने पराभूत झालेला भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेपूर्वी मंगळवारी येथे बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या व अखेरच्या सराव सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यत प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी करण्यास भारतीय प्रयत्नशील आहेत. जेतेपदाचा प्रबळ दावेदार भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवात अनुकूल झाली नाही. भारताला ओव्हलमध्ये पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ६ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. अष्टपैलू रवींद्र जडेजाने पराभव चिंतेचा विषय नसल्याचे म्हटले असले तरी, भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ जून रोजी होणाºया पहिल्या सामन्यापूर्वी आपले मनोधैर्य उंचावण्यास प्रयत्नशील राहील.आघाडीच्या फळीवर दडपणभारताची फलंदाजीची भिस्त आघाडीचे तीन फलंदाज रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांच्यावर बºयाच अंशी अवलंबून आहे. पण या तिघांना मिळून केवळ २२ धावा करता आल्या. ट्रेंट बोल्टच्या स्विंग माºयापुढे आघाडीची फळी कोसळल्यानंतर भारतीय संघाला सावरता आले नाही. त्यामुळे स्पर्धेदरम्यान या तिघांचे अपयश भारतीय संघासाठी किती नुकसानदायक ठरू शकते, याची कल्पना आलेली आहे.नंबर चारची साशंकतानंबर चारच्या फलंदाजाबाबत प्रदीर्घ कालावधीपासून चर्चा सुरू आहे. पण गेल्या लढतीत या स्थानावर के.एल. राहुल खेळला होता. त्यामुळे त्याच्याकडे ही जबाबदारी सोपविली जाऊ शकते. जडेजाने ५० चेंडूं्ना सामोरे जाताना ५४ धावांची खेळी करीत विश्वकप स्पर्धेसाठी अंतिम ११ खेळाडूंतील स्थानासाठी दावा मजबूत केला आहे. हा अष्टपैलू खेळाडू यापूर्वीही इंग्लंडमध्ये यशस्वी ठरला आहे.बुमराहवर भिस्तभारतीय गोलंदाजीचे नेतृत्व पुन्हा एकदा जसप्रीत बुमराह करणार आहे. गेल्या लढतीत त्याने चार षटकात दोन धावांच्या मोबदल्यात एक बळी घेतला होता. भारताने दोन बळी झटपट घेतले होते. पण गोलंदाजांना त्याचा लाभ घेता आला नाही. बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाचा अशा छोट्या छोट्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न राहील.हवामान खात्याचा इशाराहवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली असून सामना विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असल्यास वेगवान गोलंदाज त्याचा लाभ घेऊ शकतात. तसे कार्डिफमध्ये मोठी धावसंख्या उभारली जाते. अशास्थितीत रोहित, धवन व कोहली यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहील.>प्रतिस्पर्धी संघभारत :- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के.एल. राहुल, विजय शंकर, महेंद्र सिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी.>बांगलादेश :- मशरफे मुर्तजा (कर्णधार), अबू जैद, लिटन दास (यष्टिरक्षक), महमूदुल्लाह, मेहदी हसन, मोहम्मद मिथुन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसद्देक हुसैन, मुशफिकुर रहीम (यष्टिरक्षक), मुस्ताफिजुर रहमान, रुबेल हुसैन, शाकिब अल हसन, सौम्य सरकार आणि तमीम इकबाल.