Join us  

कोहलीने अव्वल स्थान गमावले, भारत दुस-या स्थानी कायम

दुबई : रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी श्रीलंकेविरुद्ध रविवारी संपलेल्या टी-२० मालिकेत उत्कृष्ट फलंदाजीच्या बळावर आयसीसी रँकिंगमध्ये क्रमवारीत मोठी झेप घेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:51 AM

Open in App

दुबई : रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी श्रीलंकेविरुद्ध रविवारी संपलेल्या टी-२० मालिकेत उत्कृष्ट फलंदाजीच्या बळावर आयसीसी रँकिंगमध्ये क्रमवारीत मोठी झेप घेतली, कर्णधार विराट कोहली हा विवाहबंधनात अडकल्याने मालिका खेळू शकला नाही. त्याचा फटका बसताच कोहलीने अव्वल स्थान गमावले. भारताने टी-२० मालिका ३-० नी जिंकली. रँकिंगमध्ये संघ दुस-या स्थानावर आहे.टी-२० फलंदाजी क्रमवारीत कोहली तिस-या स्थानी घसरला. आॅस्ट्रेलियाचा अ‍ॅरोन फिंच अव्वल स्थानावर आला. पाठोपाठ वेस्ट इंडिजचा इव्हिन लुईस दुस-या तर कोहली तिस-या स्थानी आला. कोहली आणि फिंच यांच्यात आठ रँकिंग गुणांचा फरक आहे. कोहलीचे रेटिंग गुण ८२४ वरून ७७६ वर आले. राहुलने मालिकेत १५४ धावा फटकाविताच त्याला २३ स्थानांचा लाभ झाला. तो आता चौथ्या स्थानावर आला. रोहितने मालिकेत १६२ धावा ठोकल्या. त्याला १४ व्या स्थानावर झेप घेता आली. इंदूरच्या दुस-या सामन्यात रोहितने ११८ धावा ठोकल्या होत्या. श्रीलंकेचे फलंदाज कुसाल परेरा ३० व्या आणि उपुल थरंगा १०५ व्या स्थानावर आले.गोलंदाजीत लेग स्पिनर यजुवेंद्र चहल याने आठ गडी बाद करताच तो १६ व्या आणि हार्दिक पांड्या ३९ व्या स्थानावर दाखल झाला. कुलदीप यादव ६४ व्या स्थानावर आला आहे.जसप्रीत बुमराह हा पहिल्या दोन्ही सामन्यात बळी घेऊ शकला नव्हता तर तिस-या सामन्यात त्याला बाहेर ठेवण्यात आले. पाकचा इमाद वसीम अव्वल आणि राशिद खान दुस-या स्थानावर आला. मालिकेत भारताला क्लीन स्वीपचादेखील लाभ झाला. संघाचे आता २१ गुण झाले असून इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजला मागे टाकून भारत आता दुस-या स्थानावर आला. या मालिकेआधी भारताचे पाचवे स्थान असून, पाकिस्तान १२४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :क्रिकेटविराट कोहली