Join us  

जाफरच्या शतकाने विदर्भ मजबूत, फझल, रामास्वामीही चमकले

भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरच्या (नाबाद ११३) शतकी खेळीच्या जोरावर रणजी चॅम्पियन विदर्भाने शेष भारत संघाविरुद्ध इराणी ट्रॉफी पाच दिवसीय लढतीत पहिल्या दिवसअखेर आपली स्थिती मजबूत करताना पहिल्या डावात २ बाद २८९ धावांची दमदार मजल मारली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 4:11 AM

Open in App

नागपूर : भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरच्या (नाबाद ११३) शतकी खेळीच्या जोरावर रणजी चॅम्पियन विदर्भाने शेष भारत संघाविरुद्ध इराणी ट्रॉफी पाच दिवसीय लढतीत पहिल्या दिवसअखेर आपली स्थिती मजबूत करताना पहिल्या डावात २ बाद २८९ धावांची दमदार मजल मारली. स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला (१-६६) पहिल्या दिवशी विशेष छाप सोडता आली नाही. त्याने लेग ब्रेक चेंडूही टाकले, पण अपेक्षित यश मिळाले नाही. त्याने फैज फझलला (८९) बाद केले.जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या २४२ व्या लढतीत ५३ वे शतक झळकावले. जाफरने नाबाद खेळीत १६६ चेंडू खेळताना १६ चौकार व १ षटकार लगावला. वैयक्तिक कारकिर्दीत १२ वी इराणी (सर्वाधिक लढती मुंबईतर्फे ) लढत खेळणाऱ्या जाफरच्या नावावर १००० पेक्षा अधिक धावांची नोंद आहे. इराणी ट्रॉफीमध्ये सलग सहाव्यांदा त्याने ५० पेक्षा अधिक धावांचा स्कोअर नोंदवला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाºया विदर्भाला फझल व संजय रामास्वामी यांनी चांगली सुरुवात करुन दिली. या दोघांनी सलामीला १०१ धावांची भागीदारी केली. जयंत यादवने (१-७३) ही भागीदारी संपुष्टात आणली. त्याने संजयला (५३) बाद केले.त्यानंतर फझल व जाफर यांनी दुसºया विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. यानंतर जाफरने गणेश सतीश (नाबाद २९) याच्यासोबत तिसºया विकेटसाठी ७२ धावांची अभेद्य भागीदारी केली.धावफलकविदर्भ पहिला डाव :- फैज फझल झे. सैनी गो. अश्विन ८९, संजय रामास्वामी झे. समथ४ गो. जयंत यादव ५३, वसीम जाफर खेळत आहे ११३, गणेश सतीश खेळत आहे २९. अवांतर (५). एकूण ९० षटकांत २ बाद २८९. बाद क्रम : १-१०१, २-२१८. गोलंदाजी : नवदीप सैनी १५-३-४६-०, सिद्धार्थ कौल १४-२-४४-०, रविचंद्रन अश्विन २५-१-६६-१, शाहबाज नदीम १८-२-५६-०, जयंत यादव १८-२-७३-१.