Join us  

जाफरला त्रिशतकाची हुलकावणी, अपूर्व वानखेडे शतकाच्या उंबरठ्यावर

वसीम जाफरला वैयक्तिक त्रिशतक नोंदविता आले नसले तरी विदर्भाने शेष भारत संघाविरुद्ध इराणी ट्रॉफी स्पर्धेत पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ५ बाद ७०२ धावांची दमदार मजल मारली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:38 AM

Open in App

नागपूर : वसीम जाफरला वैयक्तिक त्रिशतक नोंदविता आले नसले तरी विदर्भाने शेष भारत संघाविरुद्ध इराणी ट्रॉफी स्पर्धेत पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ५ बाद ७०२ धावांची दमदार मजल मारली. व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या लढतीत जाफर २८६ धावा काढून बाद झाला. गुरुवारच्या धावसंख्येत त्याला केवळ एक धाव जोडता आली. दिवसभरात केवळ २८ षटकांचा खेळ झाला.जाफरने ४३१ चेंडूंना सामोरे जाताना ३४ चौकार व १ षटकार लगावला. त्याला सिद्धार्थ कौलने तंबूचा मार्ग दाखविला. विदर्भातर्फे अपूर्व वानखेडे ९९ धावा काढून खेळपट्टीवर असून त्याने अक्षय वाडकरसोबत (३७) पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. वानखेडेने १७३ चेंडूंमध्ये १२ चौकार व २ षटकार लगावले. शुक्रवारी खेळ थांबविण्यात आला त्यावेळी तो आपल्या पहिल्या प्रथम श्रेणी शतकापासून केवळ एक धाव दूर होता. आर. अश्विनने दिवसभरात गोलंदाजी केली नाही.अपूर्व वानखेडेच्या शानदार शतकाची उत्सुकताविदर्भ शनिवारी वानखेडेला शतक पूर्ण करण्याची संधी देते की डाव घोषित करतो, याबाबत उत्सुकता आहे. पाटा खेळपट्टीवर विदर्भाला शेष भारताचा डाव गुंडाळणे सोपे जाणार नाही.नियमानुसार जर शेष भारत संघाचा पूर्ण डाव आटोपला नाही तर विजेता संघ रनरेटच्या आधारावर निश्चित होईल.>धावफलकविदर्भ पहिला डाव :- फैज फझल झे. सैनी गो. अश्विन ८९, संजय रामास्वामी झे. समर्थ गो. जयंत यादव ५३, वसीम जाफर त्रि. गो. कौल २८६, गणेश सतीश झे. भरत गो. कौल १२०, अपूर्व वानखेडे खेळत आहे ९९, अक्षय वाडकर झे. भरत गो. नदीम ३७, आदित्य सरवटे खेळत आहे ०४. अवांतर (१४). एकूण २०८ षटकांत ५ बाद ७०२. बाद क्रम : १-१०१, २-२१८, ३-५०७, ४-६००, ५-६९१. गोलंदाजी : नवदीप सैनी ३२-७-१०६-०, सिद्धार्थ कौल ३६-७-९१-२, रविचंद्रन अश्विन ४३-२-१२३-१, शाहबाज नदीम ४५-५-१५९-१, जयंत यादव ४८-३-२०२-१, रविकुमार समर्थ ४-०-९-०.