Join us  

आयपीएल खेळ व खेळाडूच्या हिताची आहे का?  

इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) ‘फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट’चे (फेमा) उल्लंघन केले असेल तर गेल्या दहा वर्षांत ज्या काही टूर्नामेंट आयोजित केल्या, त्याला ‘खेळ’ म्हणता येईल का? याचा विचार करण्याची वेळ आयपीएलच्या आयोजकांवर आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:41 AM

Open in App

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) ‘फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट’चे (फेमा) उल्लंघन केले असेल तर गेल्या दहा वर्षांत ज्या काही टूर्नामेंट आयोजित केल्या, त्याला ‘खेळ’ म्हणता येईल का? याचा विचार करण्याची वेळ आयपीएलच्या आयोजकांवर आली आहे. आयपीएलने आपल्या सर्वांना ‘फिक्सिंग’ व ‘बॅटिंग’सारख्या शब्दांशी परिचित केले. त्यामुळे आयोजक, रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारने आयपीएल आयोजित करणे हे खेळ व खेळाडूच्या हिताचे आहे का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी नोंदविले.न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने ललित मोदी यांना दिलासा देत, त्यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) सक्षम प्राधिकरणामध्ये साक्ष देणा-या बीसीसीआयच्या सात अधिकाºयांची उलटतपासणी घेण्याची परवानगी दिली.जुलै २०१५ मध्ये सक्षम प्राधिकरणाने मोदी यांच्याविरुद्ध साक्ष देणा-या बीसीसीआयच्या अधिकाºयांची उलटतपासणी घेण्यास नकार दिला. या आदेशाला ललित मोदी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.प्राधिकरणाने नैसर्गिक न्यायदान तत्त्वाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या वकिलांना साक्षीदारांची उलटतपासणी घेता यावी, यासाठी प्राधिकरणाने साक्षीदारांना समन्स बजावून २ मार्च रोजी प्राधिकरणापुढे उपस्थित राहण्यास सांगावे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी १३ मार्चपर्यंत उलटतपासणी पूर्ण करावी आणि प्राधिकरणाने ३१ मे पर्यंत कार्यवाही पूर्ण करावी,’ असे निर्देश उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला दिले.परंतु, दक्षिण आफ्रिकेत २००९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयपीएलच्या सामन्यांदरम्यान फेमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने उघडपणे नाराजी व्यक्त केली.‘जर आयपीएलने फेमाचे उल्लंघन केले असेल तर गेल्या दहा वर्षात टूर्नामेंट आयोजित करून जे काही साध्य केले, त्याला ‘खेळ’ म्हणता येईल का? याचा विचार करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. आयपीएलने आपल्या सर्वांना ‘फिक्सींग’ व ‘बेटींग’ सारख्या शब्दांशी परिचीत केले. त्यामुळे आयोजक, आरबीआय व केंद्र सरकारवर आयपीएल आयोजित करणे हे खेळ व खेळाडूंच्या हिताचे आहे का? हे पाहण्याची वेळ आली आहे,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेदरम्यान बीसीसीआय व आयपीएलने तेथील बँकेचे खात्यात कोट्यवधी रुपये ठेवले. २०१३ मध्ये ईडीने याबाबत मोदींवर कारवाई केली. मात्र अटकेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मोदींनी देशाबाहेर पळ काढला.

टॅग्स :आयपीएलआयपीएल 2018क्रिकेट