Join us  

भारतीय महिलांना नमवून इंग्लंडने साधली बरोबरी

फलंदाजी ढेपाळल्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला सोमवारी दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात २१ षटके व ८ गडी राखून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 3:49 AM

Open in App

नागपूर : फलंदाजी ढेपाळल्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला सोमवारी दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात २१ षटके व ८ गडी राखून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाºया भारतीय संघातर्फे केवळ तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. त्यात फॉर्मात असलेल्या स्मृती मानधना (४२) व अष्टपैलू दीप्ती शर्मा (नाबाद २६) यांचा समावेश आहे. डावखुरी युवा फिरकीपटू सोफी एक्लेसटोन (४-१४) व अनुभवी आॅफ स्पिनर डॅनियली हेजल (४-३२) यांच्या माºयापुढे भारतीय फलंदाजांची डाळ शिजली नाही. भारताचा डाव ३७.२ षटकांत ११३ धावांत संपुष्टात आला.इंग्लंडने केवळ २९ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ११७ धावा काढून तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. डेनियल वॅट (४७) व टॅमी ब्युमोंट (३९) यांनी सलामीला ७३ धावांची भागीदारी करीत इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. एकता बिष्टने (२-४४) सलग षटकांमध्ये व्हाईट व एमी जोन्स (०) यांना माघारी परतवले, तरी त्याचा इंग्लंडवर काही परिणाम झाला नाही.