IPL 2020: DRS घेऊ नको, अंपायरने केला इशारा?; आयपीएलमध्ये आता नवा वाद

दुबईत झालेल्या या सामन्यात अंपायर चौधरी एका नव्या वादात सापडले आहेत.

By मुकेश चव्हाण | Published: October 28, 2020 12:58 PM2020-10-28T12:58:24+5:302020-10-28T20:28:34+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Umpire triggers controversy by allegedly influencing DRS call | IPL 2020: DRS घेऊ नको, अंपायरने केला इशारा?; आयपीएलमध्ये आता नवा वाद

IPL 2020: DRS घेऊ नको, अंपायरने केला इशारा?; आयपीएलमध्ये आता नवा वाद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : Indian Premier League (IPL 2020) मध्ये खेळाडूंचे वाद-विवादामध्ये अडकणे नवे नाही. मात्र अंपायर एखाद्या अडचणीत सापडण्याची शक्यता धूसरच. आता अशाच एका अडचणीत आयपीएलचे अंपायर अनिल चौधरी (Anil Chaudhary) अडकले आहेत. मंगळवारी झालेल्या सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad)  विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)  सामन्यात डीआरएस न घेण्याबाबत त्यांनी खेळाडूला इशारा केल्याचे म्हटले जात आहे. यामुळे आता चौधरी टार्गेट होत आहेत.

दुबईत झालेल्या या सामन्यात अंपायर चौधरी एका नव्या वादात सापडले आहेत. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २ बाद २१९ धावांचा डोंगर उभारल्यानंतर  दिल्लीचा डाव  १३१ धावांत संपुष्टात आणत ८८ धावांनी धमाकेदार विजय मिळवला. मात्र यावेळी धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीच्या डावात एक नाट्य घडले आणि येथून चर्चेला सुरुवात झाली.

दिल्लीच्या डावातील १७व्या षटकात हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याच्या गोलंदाजीवर रविचंद्रन अश्विनविरुद्ध पायचीतचे जोरदार अपील करण्यात आले. यावर चौधरी यांनी नाबाद असल्याचा निर्णय दिला. मात्र हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि संदीप यांच्यामध्ये डीआरएस घेण्याबाबत संभ्रम निर्माण झाला.

नेमकं याचवेळेला चौधरी यांनी आपल्या हातावर दोनवेळा टॅप करत इनसाईड कट लागल्याचे वॉर्नरला सूचित केल्यासारखे दिसले. चौधरी यांची ही हालचाल नेमकी कॅमेरातही पकडली गेली. यानंतर वॉर्नरने डीआरएस न घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सामन्याच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला नसला, तरी आयपीएलच्या नियमांचे उल्लघन प्रकरणी चौधरी आता संशयाच्या कचाट्यात सापडले आहेत.

आयपीएलच्या नियमावलीनुसार, डीआरएस घेण्याबाबत खेळाडू अंपायरच सल्ला घेऊ शकत नाही, किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चाही करु शकत नाही. दरम्यान, चौधरी यांनी याप्रकारे कोणताही इशारा केला असल्याचे अद्याप स्पष्टही झालेले नाही. विशेष म्हणजे चौधरी यांच्या या हालचालीबाबत समालोचक आणि माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरीसम संजय मांजरेकर आणि ब्रेट ली यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

Web Title: IPL 2020: Umpire triggers controversy by allegedly influencing DRS call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :IPL 2020IPL 2020