Join us  

IPL 2021 : अर्शदीप सिंगचे अखेरचे षटक शानदार, आरसीबीविरुद्ध सनरायजर्सची प्रतिष्ठा पणाला

IPL 2021 : जर सॅमसनची खेळी बघणे सुखावणारे होते तर प्रतिभावान युवा अर्शदीप सिंगचा विश्वासही दिसत होता. त्याने उच्च दर्जाच्या गोलंदाजांना जे शक्य होत नाही, अशा स्थितीत स्वत:ला दडपणापासून दूर ठेवले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 7:10 AM

Open in App

- सुनील गावसकर...यांच्या लेखणीतून

जगातील सर्वांत शानदार टी-२० लीगची सुरुवात सर्वसाधारण, अविश्वसनीय व रोमांचक झाली. यादरम्यान शानदार कामगिरी बघायला मिळाली आणि स्पर्धा आहे तर अखेरच्या चेंडूपर्यंत कुणालाही कमी लेखता येणार नाही, हेसुद्धा अनुभवायला मिळाले. संजू सॅमसनची शानदार शतकी खेळीही नव्या शैलीत असलेल्या पंजाब संघाला अखेरच्या चेंडूवर विजय मिळविण्यापासून रोखू शकली नाही. जर सॅमसनची खेळी बघणे सुखावणारे होते तर प्रतिभावान युवा अर्शदीप सिंगचा विश्वासही दिसत होता. त्याने उच्च दर्जाच्या गोलंदाजांना जे शक्य होत नाही, अशा स्थितीत स्वत:ला दडपणापासून दूर ठेवले.

अर्शदीपने अशा कोनातून गोलंदाजी केली की, त्याच्याविरुद्ध फटके खेळणे कठीण होते. रात्रीच्या अंधारात सॅमसनला चेंडू चंद्राप्रमाणे  दिसत असला तरी त्याच्यासाठीही ते सोपे नव्हते. त्याचसोबत पंजाबचा कर्णधार केएल राहुलनेही प्रभावित केले. त्याने संजू सॅमसनच्या आक्रमक खेळीदरम्यान स्वत:चा संयम ढळू दिला नाही. 

दरम्यान, हैदराबाद संघ मोहम्मद नबीला आणखी एक संधी देण्यास उत्सुक असेल. संघाच्या फलंदाजी क्रमावर बरीच चर्चा झाली आहे. हैदराबादने आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करायला हवी. त्यांनी आपल्या चपळ व वेगवान क्षेत्ररक्षकांना योग्य जागेवर तैनात करायला हवे. ३० यॉर्डमध्ये एकेरी धाव घेतल्या जाऊ शकते; पण जो संघ सीमारेषेवर एक किंवा दोन धावा बचावतो त्या संघाची चुरशीच्या लढतीत विजय मिळविण्याची शक्यता बळावते.  

बरेच झेल सोडल्या गेल्याचे आपण अनुभवले आहे, विशेषता मुंबईत. संघांना या बाबीवर अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.  हैदराबाद संघ सलग दोन पराभवांसह स्पर्धेची सुरुवात करण्याच्या स्थितीत नाही. त्यापासून बचावासाठी त्यांना बँगलोरविरुद्ध सर्वकाही पणाला लावावे लागेल. (टीसीएम)

- स्पर्धेचा टोन पहिल्या लढतीपासून निश्चित झाला होता. सलामी लढत अखेरच्या चेंडूपर्यंत रंगली होती. स्पर्धेचा पहिला आठवडा पूर्ण होण्यापूर्वी असे आणखी काही सामने अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. - बँगलोरने आपल्या मोहिमेची सुरुवात गत चॅम्पियन मुंबईला हरवत केली आणि आता त्यांना हैदराबादविरुद्ध खेळायचे आहे. - हैदराबादला या लढतीत आपल्या पहिल्या लढतीच्या तुलनेत चांगला खेळ करावा लागेल. जेसन होल्डर विलगीकरणातून बाहेर आल्यामुळे संघासाठी एक शानदार अष्टपैलू खेळाडू उपलब्ध झाला आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१