Join us  

विजयी मार्गावर परतण्यास सीएसके, रॉयल्स उत्सुक

दोन्ही माजी विजेत्यांना आपापल्या गत सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:22 AM

Open in App

पुणे : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज शुक्रवारी लढतील. या सत्रात पहिल्यांदाच दोन्ही संघ आमने सामने येत असून हे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक असतील. दोन्ही माजी विजेत्यांना आपापल्या गत सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहिल.राजस्थान रॉयल्सने चारपैकी दोन सामने जिंकले आहे, तर सीएसकेनेही तीनपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघांचे गुण सारखे असले तरी सरस नेट रनरेटच्या आधारावर सीएसके चौथ्या तर राजस्थान पाचव्या स्थानावर आहे. नवा कर्णधार रहाणेच्या राजस्थानच्या संघाची सुरुवात खराब राहिली. पहिल्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. संघाने पुढच्या दोन सामन्यात विजय मिळवला, तर मागच्या सामन्यात त्यांना केकेआरने पराभूत केले. संथ खेळपट्टीवर रहाणे आणि इतर फलंदाज मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरले. राजस्थानने आठ गडी गमावून १६० धावा केल्या, हे लक्ष्य केकेआरने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. रॉयल्ससाठी संजू सॅमसन याने चांगली खेळी केली आहे. त्याने आतापर्यंत एकूण १८५ धावा केल्या आहेत. मात्र अन्य फलंदाजांची त्याला चांगली साथ लाभली नाही. रहाणेने चांगला खेळ केला असला तरी, चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात तो अपयशी ठरला. कृष्णप्पा गौथम व बेन लागलिन यांनी गोलंदाजी आक्रमणाची बाजू चांगली सांभाळली. मात्र बेन स्टोक्सने निराश केले आहे.दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्जने गत विजेत्या मुंबई इंडियन्स व केकेआरविरुद्ध विजय मिळवत चांगली सुरुवात केली. मात्र किंग्ज इलेव्हनकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. मुंबईविरुद्ध ब्रावोने ३० चेंडूत ६८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. तर सॅम बिलिंग्जने केकेआर विरुद्ध विजयात मोठा वाटा उचलला होता. धोनीच्या तुफानी खेळीनंतरही संघाला पंजाबकडून पराभव पत्करावा लागला. शेन वॉटसन आणि शार्दुल ठाकूर हे चेन्नईच्या जलदगती आक्रमणाची धुरा सांभाळत आहेत. तर लेगस्पिनर इम्रान ताहीर याने प्रभावित केले आहे. हरभजन आणि जडेजा यांचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरला.वेळ : रात्री ८ वाजतास्थळ : एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे.

टॅग्स :आयपीएल 2018