Indian Premier League ( IPL 2020) आज राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) संघ विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाशी भिडणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील पहिला डबल हेडर सामना खेळण्याचा मान RCB आणि RRला मिळाला आहे. अबु धाबी येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाला गुड न्यूज मिळाली आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) आज UAEत दाखल होत आहे आणि तो राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात दाखल होईल. पण, कोरोना व्हायरसच्या नियमांमुळे त्याची चाचणी केली जाईल. त्याला आजच्या सामन्यात सहभाग घेता येणार नाही. तो सहा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहणार आहे.
वडिलांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्याला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागले होते. पण, तो आता IPL 2020 साळी UAEच्या दिशेनं रवाना झाला आहे. RRने ट्विट करून ही माहिती दिली. ''बेन स्टोक्स आज रात्री दुबईत दाखल होती आणि त्वरीत त्याची कोरोना संदर्भातील चाचणी करण्यात येईल. संघासोबत सरावाला सुरुवात करण्यापूर्वी त्याला कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल,''असे सूत्रांनी सांगितले.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू लंडनमध्ये बायो बबलमध्ये होते आणि त्यामुळे त्यांचा क्वारंटाईन कालावधी हा 6 दिवसांहून 36 तास असा कमी करण्यात आला होता. पण, स्टोक्सच्या बाबतीत असं होणं अवघड आहे, कारण तो इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेचा भाग नव्हता. त्यामुळे त्याला 6 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. स्टोक्सच्या येण्यानं मात्र राजस्थान रॉयल्सची ताकद आणखी वाढणार आहे. त्यांची मधली फळी अधिक भक्कम होणार आहे आणि त्यांच्याकडे अतिरिक्त जलदगती गोलंदाजांचा पर्यायही असणार आहे.
स्टोक्सच्या अनुपस्थितीत रॉबिन उथप्पा आणि रियान पराग यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी होती. पण, त्यांना अपयश आलं.