Join us  

भारताचे पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर भारताची कमकुवत बाजु पुन्हा दिसून आली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 5:34 AM

Open in App

- अयाझ मेमनदुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर भारताची कमकुवत बाजु पुन्हा दिसून आली. हा सामना जागतिक कसोटी चॅम्पियनशीपसाठी महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक कसोटी सामन्यासाठी ६० गुण आहेत. मात्र, भारताला हे गुण मिळळे आता हे कठीण वाटत आहे.न्यूझीलंडने भारताला या कसोटीत कशी फलंदाजी आणि गोलंदाजी करावी, हे शिकविले आहे. भारताचे अनुभवी आणि विक्रमी फलंदाज देखील येथे गोंधळात पडले. न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा सामना त्यांना करता आला नाही.किवी संघासाठी मायदेशातील परिस्थिती फायद्याची ठरली आहे. येथे अनेक पाहुण्या संघांनी संघर्ष केला आहे. नाणेफेकीत देखील कोहली दुर्दैवी ठरला. पहिल्या सामन्यातील दहा गड्यांनी झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने कोणतीही प्रगती केली नाही. हे अत्यंत निराशाजनक आहे.स्विंग होणाºया चेंडूंसमोर नेहमीच फलंदाजांची कसोटी लागते. भारताच्या आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यावर तळाच्या फलंदाजांनी देखील आपली जबाबदारी पूर्ण केली नाही. संघाचा आधारस्तंभ असलेल्या कोहलीला मोठी खेळी करता आली नाही. इतर फलंदाज या डावात उभे राहिले. मात्र, अर्धशतकांच्या जोरावर परिस्थिती नियंत्रणात आणता आली नाही.शनिवारी या डावात आघाडीच्या तीन फलंदाजांनी अर्धशतके केलीत मात्र तरीही भारताचा डाव२४२ धावांवर संपला. सामना जिंकण्यासाठी आक्रमकपणा दाखवणे गरजेचे आहे. मात्र, परिस्थिती समजून घेणे जास्त महत्त्वाचे ठरते.न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी विशेषत: कायली जेमिमन्सन याने चांगली कामगिरी केली. तो फार वेगवान नाही. मात्र, उंचीमुळे त्याला जो बाऊन्स मिळतो त्याचा तो फायदा घेतो. साउथी आणि बोल्ट यांनी स्विंग आणि सिमवर नियंत्रण ठेवले होते. जेमिमन्सन आणि वॅगनर यांनी आखुड टप्प्याचे चेंडू टाकून भारतीय फलंदाजीला पुन्हा एकदा अडचणीत आणले.मात्र लॅथम आणि ब्लंडेल यांनी भारतीय फलंदाजांप्रमाणे अविवेकी खेळ केला नाही. बुमराह, शमी आणि उमेश आखूड टप्प्यांचे चेंडू योग्य पद्धतीने टाकायला पाहिजे.(कन्सल्टिंग एडिटर लोकमत)

टॅग्स :अयाझ मेमन