सद्य:स्थितीत भारतीय गोलंदाजी सर्वोत्कृष्ट : मोईन अली

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने सांगितले, की सद्य:स्थितीत भारतीय गोलंदाजी सर्वोत्कृष्ट आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 03:52 AM2018-09-09T03:52:03+5:302018-09-09T03:52:05+5:30

whatsapp join usJoin us
Indian bowlers are the best in present: Moin Ali | सद्य:स्थितीत भारतीय गोलंदाजी सर्वोत्कृष्ट : मोईन अली

सद्य:स्थितीत भारतीय गोलंदाजी सर्वोत्कृष्ट : मोईन अली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने सांगितले, की सद्य:स्थितीत भारतीय गोलंदाजी सर्वोत्कृष्ट आहे. पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या दिवशी अलीने १७० चेंडूंत ५० धावा केल्या. शिवाय अ‍ॅलिस्टर कूकसोबत त्याने ७३ धावांची भागीदारीही रचली. यामुळे इंग्लंडने दिवसअखेर ७ गडी गमावून १९८ धावांपर्यंत मजल मारली होती. अली म्हणाला, विकेट स्लो असल्यामुळे चेंडू दिशा बदलत होता. त्यामुळे मी संयमी खेळावर जोर दिला. भारतीय गोलंदाजी खरोखरच उत्कृष्ट होत होती. त्यांनी मला फटके मारण्याजोगा एकही चेंडू फेकला नाही. त्यामुळे मी संयम कायम ठेवला. मी अशा प्रकारचा खेळ कधी करीत नाही.
आम्हाला माहीतच होते ते चांगले गोलंदाजी करणार; परंतु ते आमच्यावर वर्चस्व गाजवत होते. एका टप्प्यावर आणि अधिक गतीने गोलंदाजी
करत होते. मी याआधी अशा प्रकारच्या गोलंदाजीचा सामना कधी केला नाही. जागतिक स्तरावर हा सर्वोत्कृष्ट गोलंदाजांचा संघ आहे, असे अली म्हणाला.

Web Title: Indian bowlers are the best in present: Moin Ali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.