Join us  

Video : टीम इंडियाच्या प्रशिक्षकांची भटकंती, रवी शास्त्रींचा अनोखा अंदाज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून किंगस्टन येथे खेळवला जाणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:54 PM

Open in App

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून किंगस्टन येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने अँटिग्वा येथे खेळवलेल्या पहिल्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत भारताने चौथ्या दिवशीच यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर संघातील खेळाडूंनी भटकंतीचा आस्वाद लुटला. खेळाडूंनी कॅरेबियन समुद्राची सफर केली. मग, भारतीय संघाच्या प्रशिक्षकांना भटकंतीचा मोह झाला नसता तर त्याचे आश्चर्य वाटले असते. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनीही अँटिग्वा येथे भटकंती केली.

शास्त्री, अरुण आणि श्रीधर हे तिघेही पोहोचले जमैका येथील बॉब मॅर्ली म्युझियममध्ये. जमैकातील संगीत जगभरात पोहोचवणाऱ्या मॅर्ली यांच्या कामाला मानवंदना देण्यासाठी या म्युझियमची उभारणी करण्यात आली. या म्युझियमला भेट देताना शास्त्री भलतेच खुश असल्याचे दिसत होते. त्यांनी मॅर्ली यांच्या संगीतावर तेथील स्थानिकासोबत तालही धरला.

पाहा व्हिडीओ...

Photo : टीम इंडियासोबत अनुष्काची समुद्र सफर!

रवी शास्त्रींनी सोशल मीडियावर केला फोटो शेअर, नेटिझन्सना मिळालं आयतं कोलीत

भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात दमदार कामगिरी केली आहे. ट्वेंटी-20, वन डे मालिकांपाठोपाठ टीम इंडिया कसोटी मालिका खिशात घालण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बदलेल अशी चर्चा होती, परंतु क्रिकेट सल्लागार समितीनं पुन्हा एकदा शास्त्रींनाच संधी दिली. त्यामुळे शास्त्रींचा आनंद आणखी द्विगुणीत झाला. त्यात टीम इंडियाही त्यांना विजयाची भेट देत आहे. अँटिग्वा कसोटी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू रिलॅक्स मूडमध्ये आहेत आणि अशात शास्त्री रिलॅक्स नसतील, असे होणार नाही.  त्यांनी रिलॅक्स मूडवाला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि नेटिझन्सना ट्रोल करण्यासाठी आयतं कोलीतच सापडलं.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरवी शास्त्री