India vs West Indies 2nd ODI: विराट कोहलीने रचला इतिहास, बनला क्रिकेट विश्वातील अव्वल फलंदाज

ही विक्रमी कामगिरी करणारा तो जगातील अव्वल फलंदाज ठरला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 08:41 PM2019-08-11T20:41:59+5:302019-08-11T20:42:22+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies 2nd ODI: Virat Kohli has made history, becoming the top batsman in the cricket world | India vs West Indies 2nd ODI: विराट कोहलीने रचला इतिहास, बनला क्रिकेट विश्वातील अव्वल फलंदाज

India vs West Indies 2nd ODI: विराट कोहलीने रचला इतिहास, बनला क्रिकेट विश्वातील अव्वल फलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पोर्ट ऑफ स्पेन, भारत वि. वेस्ट इंडिज : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले. ही अर्धशतकी खेळी साकारताना कोहलीने एक इतिहास रचला आहे. ही विक्रमी कामगिरी करणारा तो जगातील अव्वल फलंदाज ठरला आहे.

भारताला दुसऱ्या सामन्यात सलामीवीर शिखर धवनच्या रुपात पहिला धक्का बसला. धवन आऊट झाल्यावर कोहली फलंदाजीला आला आणि आपल्या आक्रमक शैलीत त्याने फटकेबाजी करायला सुरुवात केली. ही फटकेबाजी करताना कोहलीने इतिहास रचला आहे.

कोहलीने या सामन्यात 19 धावा जेवहा केल्या, तेव्हा त्याने इतिहास रचला. कारण त्यावेळी वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा कोहली हा अव्वल फलंदाज ठरला. कोहलीने यावेळी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांना पिछाडीवर सोडले. मियांदाद यांच्या नावावर 1930 धावा होत्या. या धावा त्यांनी 64 डावांमध्ये केल्या होत्या. कोहलीने मात्र हा धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. हा विक्रम मोडीत काढताना कोहली मियांदाद यांच्यापेक्षी 34 डाव कमी खेळला आहे.

क्विन्सपार्कवर भारतीय संघच आहे किंग; 12 वर्षांपासून आहे अपराजित
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यांमध्ये आज दुसरा सामना क्विन्स पार्क ओव्हल येथे होणार आहे. पण या क्विन्स मैदानावर भारतीय संघच किंग असल्याचे दिसत आहे. कारण गेल्या 12 वर्षांमध्ये भारतीय संघ या मैदानात एकही सामना गमावलेला नाही. त्याचबरोबर भारताने भारताबाहेर सर्वात जास्त धावसंख्या याच मैदानात रचलेली आहे.

भारताने 2007 साली झालेल्या विश्वचषकात भारत आणि बर्म्युडा यांच्यातील सामना या मैदानात झाला होता. बर्म्युडाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारताने या संधीचा चांगलाच फायदा उचलला होता. भारताने बर्म्युडाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 412 धावा केल्या होत्या. या सामन्यात वीरेंद्र सेहवागने 114 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर सौरव गांगुली, युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांनी अर्धशतके झळकावली होती.

या मैदानात 23 मार्च 2007 साली भारताला श्रीलंकेडून पराभव पत्करावा लागला होता. हा या मैदानातील भारताचा अखेरचा पराभव होता. कारण यानंतर सात  सामने या मैदानात खेळले गेले आणि एकाही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला नाही. त्यामुळे गेल्या बारा वर्षांपासून भारतीय संघ या मैदानावर अपराजित आहे.

Web Title: India vs West Indies 2nd ODI: Virat Kohli has made history, becoming the top batsman in the cricket world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.